Sunday, September 6, 2026
Homeगोंदियाशर्टच्या वरच्या खिशात असलेल्या मोबाइलचा स्फोट.. -शिक्षकाचा जागीच मृत्यू तर एकजण...

शर्टच्या वरच्या खिशात असलेल्या मोबाइलचा स्फोट.. -शिक्षकाचा जागीच मृत्यू तर एकजण किरकोळ जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-शर्टच्या वरच्या खिशात असलेल्या मोबाइलचा स्फोट झाल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील  सिरेगावटोला,ता.साकोली, सानगडी मार्गावरील केसलवाडा फाटा परिसरात काल,शुक्रवारी ६ डिसेंबरच्या सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.दुचाकीवरून जात असलेल्या शिक्षकाच्या शर्टच्या खिशात ठेवलेल्या मोबाइलचा स्फोट होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.तर मागे बसलेले वृध्द  जखमी झाले.सुरेश भिकाजी संग्रामे वय ५४ वर्षे रा.सिरेगाव टोला ता.साकोली असे मृत शिक्षकाचे तर नत्थू गायकवाड असे जखमी वृध्द इसमाचे नाव आहे.
काल,शुक्रवारी सानगडी येथे आठवडी बाजार होते. त्यामुळे दोघेही बाजारासाठी गेले होते.दरम्यान,बाजार करून परत स्वगावी सिरेगाव टोलाकडे जात असतांना सिरेगाव ते सानगडी मार्गावरील केसलवाडा फाटा परिसरात सुरेश यांच्या शर्टच्या वरच्या खिशात असलेला मोबाइलचा स्फोट झाला.त्यामुळे त्यांचे कपडे जळून छातीच्या काही भागही जळाला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.तर सोबत दुचाकीवर मागे बसून असलेले त्याचे वृध्द नत्थू गायकवाड गाडीवरून पडल्याने,किरकोळ जखमी झाले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!