- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-राज्यात विविध पक्षांचे २८८ आमदार निवडून आलेले आहेत.अशातच गुरुवारी ५ डिसेंबरला मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री शपथविधी सोहळा संपन्न झाला.मात्र,अजूनही नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी बाकीच असल्याने मला आमदार झाल्यासारखं वाटायचेच आहे; अशी अनेकांची मनधारणा झाल्याने,आता प्रतीक्षा संपली.नवनिर्वाचित सर्वपक्षीय आमदारांच्या शपथविधीसाठी आज शनिवारपासून तीन दिवसीय विशेष अधिवेशन मुंबईतील विधानभवनात होत आहे.दिनांक-७ डिसेंबर,८ डिसेंबर आणि ९ डिसेंबर असे तीन दिवस हे अधिवेशन होईल.नवनिर्वाचित आमदारांना हंगामी विधानसभा अध्यक्ष कालिदास कोळंबकर शपथ देतील.आमदारांचा शपथविधी झाल्यानंतर नव्या विधानसभा अध्यक्षाची निवड होणार आहे.त्यानंतर राज्यपालांचे अभिभाषण होईल.
- Advertisement -

