- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज दाखल करण्यासाठी शाळा आणि विद्यार्थ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह अर्ज भरण्यासाठी परीक्षा परिषदेने ३० नोव्हेंबरची मुदत दिली होती.आता यात बदल करीत ७ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने ९ फेब्रुवारीला राज्यभरात पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची परीक्षा ऑनलाइन घेतली जाणार आहे.या परीक्षेसाठी शाळा नोंदणी आणि विद्यार्थी नोंदणीचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी १७ ऑक्टोंबर ते ३० नोव्हेंबरचा कालावधी देण्यात आला होता.मात्र,काही शाळांनी विनंती केल्याने नियमित शुल्कासह अर्ज सादर करण्याची मुदत ७ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.या मुदतीनंतर १५ डिसेंबरपर्यंत विद्यार्थी विलंब शुल्कासह अर्ज दाखल करू शकतील. त्या मुदतीत अर्ज नोंदवू न शकणारे विद्यार्थी २३ डिसेंबरपर्यंत अति विलंब शुल्कासह अर्ज दाखल करू शकतील.तर अति विशेष विलंब शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत २४ डिसेंबर ते ३१ डिसेंबर आहे.त्यानंतर विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत; असे राज्य परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.
गतवर्षी पाचवीच्या परीक्षेसाठी ५ लाख १० हजार ६७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.त्यापैकी ४ लाख ९२ हजार ३७३ हजार विद्यार्थी बसले होते.तर १८ हजार २९९ विद्यार्थी गैरहजर राहिले होते.
- Advertisement -

