Tuesday, September 15, 2026
Homeभंडारापॉलिसीचे मासिक हप्ते थकित म्हणून मृत्यूपश्चात मिळणारा लाभ विमा कंपनीला नाकारता येणार...

पॉलिसीचे मासिक हप्ते थकित म्हणून मृत्यूपश्चात मिळणारा लाभ विमा कंपनीला नाकारता येणार नाही… – विमा कंपनीला ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा :-एखाद्या व्यक्तीचे काही कारणास्त विमा पॉलिसीचे मासिक हप्ते थकित असल्यास मृत्यूपश्चात मिळणारा लाभ विमा कंपनीला नाकारता येणार नाही. संबंधित व्यक्तीच्या वारसांना मृतकाच्या पॉलिसीचा संपूर्ण लाभ द्यावा; असे आदेश भंडारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिले आहे.या निर्णयाने विमा कंपनीला चांगलीस चपराक बसली आहे.तक्रारकर्त्या रुपाली भुदेव रेहपाडे यांचे पती मृत भुदेव रेहपाडे हे पाटबंधारे विभागात कार्यरत होते.दरम्यान,२७ फेब्रुवारी २०२१ रोजी कोवीड १९ च्या प्रादुर्भावाने निधन झाले.मृत भुदेव रेहपाडे यांनी भारतीय जीवन विमा निगम भंडारातर्फे आधारस्तंभ नावाची पॉलिसी काढली होती व सदर पॉलिसीचे मासिक हप्ते हे त्यांच्या शासकीय कार्यालयातून मिळणाऱ्या पगारातून कपात करण्यात येत होते.दरम्यान,काही कारणास्तव मृतकाचे एप्रिल,मे व जून या तीन महिन्याचे विमा पॉलिसीचे मासिक हप्ते थकीत झाले होते.तर जुलैपासून विमा पॉलिसीचे मासिक हप्ते नियमित भरण्यात आले.भुदेव रेहपाडे यांच्या मृत्यूपश्चात त्यांची पत्नी रुपाली भुदेव रेहपाडे यांनी विमा पॉलिसीचा लाभ मिळण्याबाबत भारतीय विमा निगम कार्यालय भंडाराकडे अर्ज सादर केला असता, मृतकाच्या पॉलिसीचे तीन मासिक हप्ते थकीत असल्याचे कारण पुढे करून रूपाली भुदेव रेहपाडे यांना मृत्यूपश्चात पॉलीसीचा लाभ देण्यास नकार दिला.रुपाली भुदेव रेहपाडे यांनी याप्रकरणी भंडारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार केली.ग्राहक मंचाने याप्रकरणी सर्व लेखी पुरावे व बयाण नोंदवून घेत किस्त थकीत असल्याने पॉलीसी लाभार्थ्यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या कुटुंबीयांना लाभ नाकारणे,हे चुकीचे असून भारतीय विमा निगम कार्यालयाने भुदेव रेहपाडे यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या कुटुंबीयांना विमा पॉलीसीचा संपूर्ण लाभ देण्याचे आदेश दिले.त्यासोबतच त्या लाभामधून मृतकाचे थकीत असलेले तीन मासिक किस्त वजा करण्याचे आदेश ग्राहक मंचाचे अध्यक्ष सतीश आ.सप्रे,गणपुत,सदस्या जयश्री बु.गोपनारायण व सदस्य पराग मो. सुभेदार यांनी दिले.तक्रारकर्त्यातर्फे ॲड.सुखदेवसिंह चौहान,ॲड.संतोषसिंह एस.चौहान, ॲड.शैलेंद्रसिह एस.चौहान व ॲड.जयदेवसिंह एस.चौहान यांनी बाजु मांडली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सामाजिक,सहकार व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा संकल्प फाउंडेशनतर्फे गौरव..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या गेवर्धा येथे आज,सोमवार १४ सप्टेंबर रोजी संकल्प फाउंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे सामाजिक,सहकार व शैक्षणिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गावातील तीन...

पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-परंपरेचे जतन आणि पर्यावरणाचे संरक्षण यांचा समतोल साधणे ही सामूहिक जबाबदारी आहे. गणेशोत्सवाचा आनंद घेतांना पर्यावरणाची हानी होणार नाही,याची काळजी घेणे...

अतिवृष्टीग्रस्त कुटुंबीयांना १ लाख ३० हजाराची आर्थिक मदत वितरित.. -भाजपा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये यांच्या पाठपुराव्याला यश..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-अतिवृष्टीमुळे घर कोसळून नुकसान झालेले कुरखेडा शहराच्या गांधी वार्डातील ज्येष्ठ नागरिक नरेश हडप यांच्या कुटुंबाला प्रशासनाकडून १ लाख ३० हजारांची आर्थिक मदत...

अज्ञात वाहनाच्या धडकेत चितळाचा मृत्यू; तर कुंपणात अडकून बिबट्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्यात एकाच दिवशी वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन वन्य प्राण्यांचा मृत्यू झाल्याने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील तावशी संभाजीनगर महामार्गावर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!