Sunday, August 9, 2026
Homeदेसाईगंजऔद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंजतर्फे रासेयो निवासी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन- कोंढाळा जिल्हा परिषद...

औद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंजतर्फे रासेयो निवासी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन- कोंढाळा जिल्हा परिषद शाळेच्या आवारात उद्घाटन संपन्न…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :- कौशल्य विकास,रोजगार व उद्योजक्ता विभाग,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य औधोगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंच्या राष्ट्रीय सेवा योजना मार्फत कोंढाळा निवासी ५ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी २०२३ पर्यंत श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.सदर विशेष शिबिराचे उद्घाटन ग्रामपंचायतीच्या सरपंचा अपर्णा नितीन राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.

राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मता,सर्वधर्म समभाव,सहिष्णुता, सामाजिक बांधिलकी यासाठी स्वयंसेवक तत्पर व सक्षम व्हावा; यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाचे व उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असते.

“मी नाही पण तू ” या बोधवाक्यानुसार विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक आणि राष्ट्रीय नागरिक,जबाबदारी , टीमवर्क आणि संविधानिक,लोकशाही दृष्टीकोण निर्माण व्हावा असे विविध गुण विकसित करण्याची जबाबदारी या निवासी श्रमसंस्कार विशेष शिबिरा दरम्यान केली जाते. 

शिबिराचे कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी रोशनीताई पारधी माजी सभापती महिला व बालकल्याण विभाग जिल्हापरिषद गडचिरोली,गजानन सेलोटे उपसरपंच, किरणताई कुंभलवार पोलीस पाटील कोंढाळा,प्रदीप तुपट ग्रामवासी,नितेश पाटील लोकमत पत्रकार,संदीप साबळे,प्राचार्य सुरेश एस.चौधरी औद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंज, अनिल मुलकलवार मुख्याध्यापक, टी.आर खोब्रागडे गटनिर्देशक,आर.एम.गोतमारे गटनिर्देशक औद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंज , सी.एम.गरमळे रासेयो मुख्य समन्वयक,व्ही.वाय. नागमोती रासेयो सह समन्वयक,ए.व्ही.भोले,आर बी.भोयर,आर.के.लोही,सी. डी.समर्थ, एम.एस.कापगते, शोभा एस.प्रधान,एल एच.लाडे,एच. के मरसकोल्हे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील सर्व कर्मचारी वृंद तसेच गावातील प्रतिष्टीत नागरिक जिल्हा परिषद शाळेतील कर्मचारी वृंद,ग्रामपंचायत सदस्य वकर्मचारी यांचे सहकार्य लाभले असून सदर उद्घाटन शिबिरप्रसंगी गावकरी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

प्रास्ताविक सी.एम.गरळमळे रासेयोसमन्वयक यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश मेश्राम व आभार प्रदर्शन विष्णू नागमोती यांनी केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंजच्या शंकरपूर येथे जागतिक आदिवासी दिन साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या  आदिवासी गोंड गोवारी समाज संघटना शाखा शंकरपूर यांच्या वतीने आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन...

आता गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीवर आकारला जाणार दहापट दंड..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीला प्रभावी आळा घालण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता,१९६६ मधील कलम ४८(७)मध्ये सुधारणा करण्यास मंगळवार २८ जुलै...

धावपट्टीवरून घसरला विमान; अजित पवारांच्या आठवणी ताज्या..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-जिल्ह्याच्या बारामती एअरफिल्डवर प्रशिक्षण सरावादरम्यान एक ट्रेनर विमान धावपट्टीवरून घसरल्याची घटना आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडल्याने एकच खळबळ उडाली...

पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या दाखल गुन्ह्यात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी व तिच्यासोबत असलेल्या संशयित आरोपीचा शोध घेण्यात अनैतिक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!