Tuesday, September 1, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तरेशनकार्ड लाभार्थ्यांना ई-केवायसीसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ... - वेळेत ई-केवायसी करण्याचे आवाहन...

रेशनकार्ड लाभार्थ्यांना ई-केवायसीसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ… – वेळेत ई-केवायसी करण्याचे आवाहन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला ‘ई- केवायसी’ करणे बंधनकारक आहे.शिधापत्रिकेत नाव असलेल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला ई-केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोंबर वरून ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
बँकेचे खाते असो किंवा शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असो,प्रत्येक ठिकाणी ई-केवायसी बंधनकारक आहे.त्यातच आता सर्वसामान्य नागरिकांना रेशनकार्डसाठीही ई-केवायसी बंधनकारक आहे.बोगस लाभार्थी शोधून काढण्याच्या उद्देशाने ई-केवायसी महत्त्वाची ठरत आहे.मात्र,पात्र लाभार्थी धान्यापासून वंचित राहू नये; यासाठी शासनाकडून सातत्याने ई-केवायसीसाठी मुदतवाढ दिली जात आहे.आता रेशनकार्ड व लाभार्थ्यांच्या ई केवायसीसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे वेळेत ई-केवायसी करावे; असे आवाहन करण्यात आले आहे.फोर-जी ई-पॉस मशीनद्वारे ई-केवायसी रेशनकार्डची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल,तर परिसरातील स्वस्त धान्य दुकानातील फोर-जी ई-पॉस मशिनद्वारे ई-केवायसी करण्याची सुविधा दिली आहे.लाभार्थ्यांचा आधारकार्ड क्रमांक टाकल्यानंतर लाभार्थ्यांचे बोटाचे ठसे व डोळे स्कॅन करून ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली जाते.पांढऱ्या व पिवळ्या रेशनकार्डधारकांसाठी ई-केवायसी करण्याची मार्गदर्शक तत्त्वे लागू केली होती.त्यात सर्व संग्रहीत छायाचित्र रेशनकार्डधारकांनी ई-केवायसी करणे अनिवार्य होते.त्यासाठी आता शेवटची तारीख ३१ डिसेंबर करण्यात आली आहे.आतापर्यंत दोनवेळा ई-केवासयी प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!