Saturday, September 5, 2026
Homeदेसाईगंजविधानसभा निवडणुकीत अनेकांची मौज... उद्योगाविना देसाईगंजसह कुरखेडा,आरमोरी,कोरची तालुक्यात बेरोजगारांची फौज...

विधानसभा निवडणुकीत अनेकांची मौज… उद्योगाविना देसाईगंजसह कुरखेडा,आरमोरी,कोरची तालुक्यात बेरोजगारांची फौज…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):- ‘गडचिरोली जिल्हा अन् खादाळावर भिल्ला’ अशी स्थिती जिल्ह्याच्या देसाईगंज,कुरखेडा,आरमोरी,कोरची व इतर तालुक्यांची झाली आहे.सध्या स्थितीत विधानसभा निवडणुकांचा डमरू सुरू आहे.अशातच अनेकांची निवडणुकीत मौज तर उद्योगाविना देसाईगंजसह कुरखेडा,आरमोरी,कोरची तालुक्यात बेरोजगारांची फौज तयार झाली आहे.उद्योगाविना तरुण मंडळी अवैध धंद्यांकडे वळलेली दिसून येत आहेत.त्यातच पाहिजे त्या प्रमाणात हाताला काम मिळत नसल्याने अवैध धंद्यांना ऊत येण्याचे महत्वाचे कारण ठरू लागले आहे.
व्यापाराची जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेला देसाईगंज तालुका उद्योग विरहित आहे.या तालुक्याला लागून चंद्रपूर,भंडारा व गोंदिया जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत; असे असतांना देखील इथे रोजगार मिळवून देण्यासाठी म्हणून उद्योग आणण्यात राजकारण्यांना सपशेल अपयश आल्याचे चित्र आहे.यामुळे उद्योगाविना चारही तालुक्यात दिवसेंदिवस बेरोजगारांची ‘फौज’ वाढत असून हे सुशिक्षित बेरोजगार आता निवडणुकीचा हंगाम पाहून चांगलीच ‘मौज’ लूटतांना दिसत आहेत.
देसाईगंज तालुका उद्योगविरहीत आहे.या तालुक्यात शेती हा मुख्य व्यवसाय आहे.शेतीच्या भरवंशावर येथील नागरिक आपली उपजीविका करतात. तालुक्यात एकही उद्योग नसल्यामुळे रोजगाराविना सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.कुरखेडा येथे औद्योगिक विकास महामंडळासाठी जागा शासनाने औद्योगिक प्रयोजनार्थ अधिग्रहित केली.मात्र,अद्यापही कुरखेडा शहरात एकही उद्योग उभा राहिला नाही.एकंदरित तालुक्यात उद्योग आणण्यात राजकारण्यांना सपशेल अपयश आले.उद्योग आणण्यास राजकारणी अपयशी ठरल्याचे बोलले जाते.परिणामी आरमोरी विधानसभेअंतर्गत येणाऱ्या चारही तालुक्यांना नेहमीच पोरकेपणाची वागणूक दिल्याची चर्चा अधून मधून डोके काढत असते.उद्योगविरहित चारही तालुक्याची भिस्त शेतीवर आहे.शेती,शेतमजुरी आणि रोजंदारीच्या कामावर येथील नागरिक आपली गुजरान करतात.शेतीचा हंगाम आटोपला की तालुक्यातील बहुतांश मंडळी रोजगारासाठी परप्रांतात धाव घेतात. चारही तालुक्यात एक ना अनेक समस्या आजही आवासून उभ्या आहेत.बेरोजगारीसह तालुक्यात सिंचनाचे प्रश्न अजूनही कायम आहेत.विधानसभेच्या निवडणुका आल्या की करंजीच्या बिया वाटल्या जातात.एकदाची निवडणूक गेली की या सारे रान मोकळे होऊन पहच्यान कोण? अशी बगल दिली जाते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!