Monday, September 7, 2026
Homeगोंदियाराजकारणाचा उद्देश केवळ पैसा कमाविणे नसून, त्यातून समाजकारण करून लोकांचे कल्याण करणे...

राजकारणाचा उद्देश केवळ पैसा कमाविणे नसून, त्यातून समाजकारण करून लोकांचे कल्याण करणे असला पाहिजे- नितीन गडकरी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-केंद्र व राज्य शासनाकडून अनेक विकास कामे मंजूर केली जातात,पण अनेक ठिकाणी नेतेच कंत्राटदार झाल्याने या कामांचा बोजवारा उडाला आहे.ही स्थिती सर्वच पक्षात असल्याचे दुर्दैवाने म्हणावे लागते.राजकारणाचा उद्देश केवळ पैसा कमाविणे हा नसून,त्यातून समाजकारण करून लोकांचे कल्याण करणे हा असला पाहिजे. राजकारणाचा अर्थ राष्ट्र कारण असायला हवा.देशात सुशासन असायला हवे,असे परखड मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल,शुक्रवारी ८  गोंदिया येथे आयोजित सभेत केले.
महायुतीतील गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार विनोद अग्रवाल आणि आमगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय पुराम यांच्या निवडणूक प्रचारार्थ गोंदिया येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.ना.नितीन गडकरी म्हणाले की,देशाला,राज्याला विकासाची दूरदृष्टी असणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे. मतदारांनी सुद्धा आपल्या भागाचा विकास कोण करू शकतो,कोण सक्षम नेतृत्व करू शकतो,या सर्व गोष्टींचा विचार करूनच मतदान करण्याची गरज आहे.योग्य नेतृत्व मिळाले,तर निश्चितच त्या भागाचा कायापालट झाल्याशिवाय राहत नाही.देशाला योग्य नेतृत्वाची गरज असल्याचे सांगितले. अलीकडे राजकारणाचा स्तर खालावत चालला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.तीन-चार वर्षांपूर्वीच गोंदिया ड्रायपोर्ट तयार करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.या प्रकल्पाची फाइल तयार होऊन पडली आहे.पण, जागा उपलब्ध न झाल्याने ड्रायपोर्ट तयार झाला नाही. त्वरित जागा उपलब्ध करून दिल्यास या प्रकल्पाचे काम सुरू होईल.त्यामुळे गोंदिया येथून विविध देशांत तांदूळ निर्यात करण्यास मदत होऊन उद्योगधंद्यांना चालना मिळेल व रोजगाराच्या संधी निर्माण होतील,असे सांगितले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माजी सरपंचांनाच प्रशासक म्हणून कायम ठेवण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींवर तत्कालीन सरपंच हे प्रशासक म्हणून नेमण्यात आले होते.अश्यातच माजी सरपंचांच्या सहा महिन्यांच्या काही प्रशासक पदाची...

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!