- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मतदानापासून कुणीही व्यक्ती वंचित राहू नये तसेच सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे; याकरीता योग्य त्या उपययोजना करून ठोस पावले उचलली आहेत.राज्याच्या २८८ जागांसाठी विधानसभा निवडणुक एकाच टप्प्यात येत्या २० नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे व लगेच तीन दिवसांत म्हणजेच २३ नोव्हेंबरला मतमोजणी प्रक्रिया पार पाडून हल्ली आमदारकीचे स्पप्न पाहू जाणाऱ्या उमेदवारांचे भवितव्य उजळणार आहे.अशातच तत्पूर्वी जिल्ह्यात गृहमतदानास काल,शुक्रवार ८ नोव्हेंबर पासून सुरुवात करण्यात आली आहे.त्यानुसार गडचिरोली जिल्ह्यातील गृहमतदानासाठी नोंदणी केलेल्या अहेरी मतदासंघांतून काल ३८ मतदारांनी गृहमतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ केला.त्यात आणखी भर पडून आज,शनिवार ९ नोव्हेंबरला आरमोरी विधानसभा मदारसंघातील गृहमतदानास सुरुवात करण्यात आली.त्यात देसाईगंज शहरातील १०१ वर्षीय ताराबाई शेंडे यांनी गृहमतदानचा लाभ घेत मतदानाचा हक्क बजावला.

- Advertisement -

