- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलेल्या एका महिलेसह पाच नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमधील बिजापूर येथे शरणागती पत्करली आहे.या पाच नक्षलवाद्यांनी शस्त्रे खाली ठेवल्याचे व अमानुष,हिंसक विचारसरणीचा त्याग करणार असल्याचे पोलिसांना स्वतःहून शरणागती पत्करल्यानंतर सांगितले.या पाच नक्षलवाद्यांमधील सुशीला उर्फ बुज्जी या महिला नक्षलवाद्याला पकडून देणाऱ्यास पोलिसांनी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.सुशीला ही नक्षलवाद्यांच्या गडचिरोली विभागातील अहेरी भागाची सक्रिय सदस्य होती.पोलिस पथकावर झालेल्या गोळीबाराच्या घटनांत ती सामील असल्याचा आरोप आहे.
पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी बिजापूर जिल्ह्यात एका ३५ वर्षीय व्यक्तीची मंगळवारी हत्या केली.मृताचे नाव दिनेश पुजारी असून, तो पोलिसांना माहिती पुरवत होता, असे लिहिलेली पत्रकेही मिळाली आहेत.
- Advertisement -

