Tuesday, August 25, 2026
Homeचंद्रपूरअजब कार्यकर्त्याने गजब मागणी करीत तिकिटासाठी केली विरुगिरी; चढला टॉवरवर..

अजब कार्यकर्त्याने गजब मागणी करीत तिकिटासाठी केली विरुगिरी; चढला टॉवरवर..

- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-राज्यातील महाविकास आघाडीकडून जागा वाटपाची बातमी धडकली.बातमी तर धडकली,मात्र ज्यांना पाहिजे होती; त्यांना न मिळाल्याने कार्यकर्ते हिरमुसले,त्यातच एक कार्यकर्ता टॉवरवर चढला असल्याची घटना बुधवारी २३ ऑक्टोंबरच्या दुपारी 3 वाजताच्या सुमारास बल्लारपूर येथील रेल्वे चौकातील बीएसएनएल टॉवर जवळ घडली.
प्रशांत गद्दाला असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे.बल्लारपूर विधानसभा क्षेत्र महाविकास आघाडीच्या कोट्यातून शिवसेना (उबाठा) पक्षाला मिळणार असल्याची खात्री चंद्रपूर जिल्हाप्रमुख संदीप गिहे व पदाधिकाऱ्यांना होती. क्षेत्रात कामाला लागा; असे आदेश उद्धव ठाकरे यांनी गिहे यांना दिले.यामुळे बल्लारपूर विधानसभा क्षेत्र पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी पिंजून काढत गावागावात मेळावे,संमेलन घेऊन शिवसेनेसाठी पोषक वातावरण निर्माण केले.ठिकठिकाणी मेळावे घेण्यासाठी कार्यकर्तेदेखील जोमाने कामाला लागले होते.शिवसेनेला महाविकास आघाडी कोट्यातून बल्लारपूर विधानसभा सुटणार व संदीप गिहे यांना उमेदवारी मिळणार,अशी अपेक्षा होती.मात्र,बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास बल्लारपूर विधानसभा क्षेत्र काँग्रेसला सोडण्याची बातमी धडकली.या बातमीमुळे शिवसेनेत एकच खळबळ उडाली. बल्लारपुरातील कार्यालयासमोर कार्यकते एकवटले. त्यांनी गदारोळ घातला.यावेळी प्रशांत गद्दाला या कार्यकर्त्याने रेल्वे चौकातील बीएसएनएल टॉवरकडे धाव घेत टॉवरवर चढला.त्यामुळे परिसरात गोंधळ निर्माण झाला.त्याला टॉवर चढल्याचे पाहताच पोलिसांनी धाव घेत त्याला ताब्यात घेतले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेत आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यास ताब्यात घेतले आहे.असे कृत्य केल्यास पोलिस स्टेशन बल्लारपूर मार्फत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल,अशी सक्त ताकीद देण्यात आली. भारतीय नागरी संहितेच्या कलम १६८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल,असे पोलिस उपनिरीक्षक लोखंडे यांनी सांगीतले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रोजगारनिर्मितीला चालना..! तब्बल १ कोटी ५९ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या ‘प्रगत काष्ठ प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्रा’चे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील समृद्ध वनसंपत्तीचा सुयोग्य वापर करून स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन करणे तसेच महिलांना आधुनिक काष्ठकलेचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या शाश्वत...

तस्करांच्या तावडीतून सुटलेल्या तब्बल २१६ कासवांचे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वन्यजीवांची तस्करी करणाऱ्या तस्करांच्या तावडीतून सुटलेल्या तब्बल २१६ भारतीय तारांकित (स्टार)कासवांना महाराष्ट्र वनविभाग आणि 'रेस्क्यूईक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर' अर्थात 'रॉ'...

बीअर बारचा परवाना देण्यासाठी पैश्याची लालच; अधिकारी एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बीअर बारचा परवाना देण्यासाठी आठ लाख रुपयांच्या लाचेच्या रकमेची मागणी करून तब्बल अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी)नागपूर पथकाने...

अचानक समोर आलेल्या कारला दुचाकीची धडक; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शहरात भीषण अपघाताची घटना घडून एका २० वर्षीय दुचाकी चालक तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला; तर सहकारी तरुण गंभीर जखमी झाल्याची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!