Wednesday, October 28, 2026
Homeगडचिरोलीरानटी हत्तींच्या कळपातील टस्कर हत्तीने तरुणास केले ठार...

रानटी हत्तींच्या कळपातील टस्कर हत्तीने तरुणास केले ठार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-रानटी हत्तींच्या कळपातील टस्कर हत्तीने चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा वनपरिक्षेत्रांतर्गत नियतन क्षेत्र मुतनूर वनखंड १४ अंतर्गत आबापूर गावातील तरुणाला पायाखाली चिरडून ठार केल्याची घटना काल,गुरुवारी २४ ऑक्टोंबरला सकाळच्या सुमारास घडली.यामुळे चामोर्शी तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरात एकच खळबळ निर्माण झाली आहे.शशिकांत रामचंद्र सतरे रा.नवेगाव (भुजला),ता.मूल,जि.चंद्रपूर असे टस्कर हत्तीच्या हल्ल्यात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. ओडिसा राज्यातून जिल्ह्यात दाखल झालेल्या हत्तींच्या कळपाचे मागील तीन वर्षांपासून संचार कायम आहे.२५ ते २८ च्या संख्येत असलेल्या या कळपातील एक हत्ती एप्रिल महिन्यात चामोर्शी, अहेरी,मुलचेरा,सिरोंचा मार्गे तेलंगणा राज्यात गेला होता.तेलंगणा राज्यात धुमाकूळ घालत टस्कर हत्तीने तेथील दोन व्यक्तींना ठार केले होते.गडचिरोली तालुक्यातील चांभार्डा,चांदाळा, रानमूल,मेंढा या गाव परिसरातील शेतशिवारात टस्कर हत्तीने धुमाकूळ घालत बुधवारी २३ ऑक्टोंबर रात्रीच्या सुमारास थेट चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा वनपरिक्षेत्रात प्रवेश केला होता.यादरम्यान शशिकांत सतरे हा तरुण त्याच्या सहकाऱ्यासोबत सेल्फी काढण्यासाठी हत्तीच्या दिशेने गेला.यावेळी चवताळलेल्या टस्कर हत्तीने शशिकांतला सोंडेने पकडून जमिनीवर आपटत पायाखाली चिरडले.यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.घटनेची माहिती प्राप्त होताच कुनघाडा वनविभागासह चामोर्शी पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला.त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात पाठविला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शंभर टक्के अनुदानावर चारा बियाणे वाटपासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात चारा उत्पादन वाढविण्यासाठी सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकरी व पशुपालकांना शंभर टक्के अनुदानावर चारा बियाणे उपलब्ध करून...

गडचिरोली जिल्ह्यात ५४ धान खरेदी केंद्रांना मंजुरी; आधारभूत धान खरेदीसाठी २० केंद्रांवर शेतकरी नोंदणी सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत पणन हंगाम २०२६-२७ साठी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत ५४ धान खरेदी केंद्रांना...

चित्तथरारक घटना..! दोन वाघांची दुचाकीवर झडप; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यातून एक चित्तथरारक घटना समोर आली आहे.रात्रीच्या अंधारात जंगलमार्गे दुचाकीने गावाकडे परतणाऱ्या तरुणाच्या दुचाकीवर दोन वाघांनी झडप घालून तरुणाला ठार केल्याची घटना...

उद्याला गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट; मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह विजांच्या कडकडाटाची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने  उद्या,बुधवार २८ ऑक्टोंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.तर चंद्रपूर, गोंदिया,नागपूर,वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!