भंडारा :-राज्य परिवहन महामंडळाच्या बस फेऱ्या लावण्यावरून चालक-वाहक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये नेहमीच वाद होत असतात.अशाच प्रकारे बस फेरीवर चालकाच्या कर्तव्याची कामगिरी क्रमानुसार लावण्याच्या मुद्द्यावरून निर्माण झालेल्या वादातून एसटी अधिकारी आणि चालकामध्ये चांगलीच फ्री स्टाईल झाली असल्याचा प्रकार भंडाऱ्याच्या साकोली आगारात घडला.
बस चालकाच्या छातीवर बसून वाहन परीक्षक अधिकाऱ्याने केली मारहाण…
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा जिल्ह्यातील परिवहन महामंडळाच्या साकोली आगारातील पंकज काटनकर असे चालकाचे नाव असून मारहाण करणारे प्रदीप करंजेकर असे अधिकाऱ्याचे नाव आहे.करंजेकर हे वाहन परीक्षक आहेत.चालक व वाहन परीक्षक यांच्यातील वाद व मारहाणीचा हा संपूर्ण प्रकार साकोली बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर घडला.बस फेरीवर चालकाच्या कर्तव्याची कामगिरी क्रमानुसार लावण्याच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला होता.या प्रकरणाबद्दल अद्याप कुणीही पोलिसात तक्रार दाखल केलेली नाही.
बस चालकाच्या छातीवर बसून त्याला वाहन परीक्षक करंजेकर हे अश्लील शिवीगाळ करीत मारहाण करीत होते.याचा संपूर्ण व्हिडिओ समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल झाला आहे.हा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वीचा असल्याची माहिती समोर आली.मात्र, याबाबत कोणाकडूनही पोलिसात तक्रार दाखल झालेली नाही.
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

