Wednesday, June 10, 2026
Homeमुंबई95 टक्के सरकारी कर्मचाऱ्यांकडे हरामाची कमाई; आमदार संजय गायकवाडांचे वादग्रस्त वक्तव्य

95 टक्के सरकारी कर्मचाऱ्यांकडे हरामाची कमाई; आमदार संजय गायकवाडांचे वादग्रस्त वक्तव्य

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुंबई :- कोणता सरकारी कर्मचारी हे पगारावर अवलंबून आहे.त्यांचा पैसा घरात ठेवायला जागा नाही.95 टक्के सरकारी कर्मचाऱ्यांकडे हरामाची कमाई आहे,असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे.

सध्या जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उगारले आहे.त्या पार्श्वभूमीवर गायकवाड यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

संजय गायकवाड म्हणाले की,सरकारी कर्मचारी हे बाहेरचे पैसे कमावून ते गंडगंज झाले आहेत, त्यांना पेन्शनची काय गरज.असा सवाल त्यांनी उपस्थित केला.सरकारी कर्मचारी हे 8 तास काम करतात, तर आमदार हे 24 तास उपलब्ध असतात,आमदार होण्यासाठी 30 वर्षे गमावले,आमचा पगार असेल 1 लाख 82 हजार.मात्र,आमचा खर्च हा महिना 5 लाखांचा आहे असे त्यांनी म्हटले आहे.

संजय गायकवाड म्हणाले की,आमदारांचा लाखभर रुपयांचा तर डिझेलचा खर्च होतो.हे सरकारी कर्मचारी माजले आहेत.शेतकरी काम घेऊन जात असले तरी 6 सहा महिने कुणाचे काम होत नाही.शेतकरी विषाच्या बाटल्या घेऊन त्यांच्याकडे जातो,असा आरोप आमदार संजय गायकवाड यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर केला आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना भरमसाठ पगार आहे.कोणता कर्मचारी सरकारी पगारावर अवलंबून आहे,असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.95 टक्के कर्मचाऱ्यांना बाहेरची हरामाची कमाई आहे, त्यांची संपत्ती घरात मावत नाही, इतके ते गडगंज झाले आहेत अशी वादग्रस्त वक्तव्य गायकवाड यांनी केले आहे.

(साभार – दिव्य मराठी)

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर ‘त्या’ शेतकऱ्यास मदतीचा हात; मुख्यमंत्र्यांकडून दखल..

उद्रेक न्युज वृत्त  लातूर :-जिल्ह्याच्या देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांच्यावर काही दिवसांपूर्वी दुहेरी संकट ओढवले होते.शेतातील मशागतीची कामे सुरू असतांनाच वादळी...

विदर्भातील शाळांसाठी दिलासादायक निर्णय; शाळा सुरू करण्यास सात दिवसांची मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र राज्याच्या विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट कायम असल्याने राज्य शिक्षण विभागाने दिलासादायक निर्णय घेतला आहे.नियोजित वेळापत्रकानुसार १५...

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!