Thursday, August 6, 2026
Homeनागपूर७ हजाराची लाच स्वीकारणारा ३४ वर्षीय तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात... -...

७ हजाराची लाच स्वीकारणारा ३४ वर्षीय तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात… – पिकाची नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी १४ हजाराची केली होती मागणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-राज्य सरकारकडून पिकाची नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी १४ हजार रुपयांची मागणी करीत ७ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाने काल,शुक्रवारी २९ नोव्हेंबरच्या सायंकाळी सावनेर शहरातील बसस्थानक परिसरात अटक केली.देवीदास पांडुरंग अंभोरे वय ३४ वर्षे असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर तलाठ्याचे नाव असून,त्याची तलाठी कार्यालय खुबाळा,ता.सावनेर येथील कार्यालयात नियुक्ती होती.तक्रारकर्ता शेतकरी खुबाळा येथील रहिवासी असून,त्यांची याच गावाच्या शिवारात शेती आहे.राज्य सरकारने पिकांची नुकसानभरपाई जाहीर केली होती.ही नुकसानभरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्याने तलाठी देवीदास अंभोरे याच्याशी संपर्क केला.सुरुवातीला त्याने टाळाटाळ केली आणि नंतर नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी १४ हजार रुपयांची मागणी केली.तडजोडीनंतर शेतकऱ्याने सात हजार रुपये देण्याचे मान्य केले.
त्याला लाच द्यायची मुळीच इच्छा नसल्याने त्याने एसीबीच्या नागपूर कार्यालयात तक्रार नोंदविली.या प्रकरणाची खातरजमा करून एसीबीच्या पथकाने काल शुक्रवारी सावनेर शहरात सापळा रचला. देवीदासने शेतकऱ्याकडून ७ हजार रुपयांची लाच स्वीकारता एसीबीच्या पथकाने त्याला ताब्यात घेत अटक केली.त्याच्याकडून ७ हजार रुपये जप्त केले.ही कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक डॉ.दिगंबर प्रधान,अप्पर पोलिस अधीक्षक संजय पुरंदरे, उपअधीक्षक रोशन यादव यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक आशिष चौधरी व वर्षा मते,हवालदार अस्मिता मल्लेलवार,वंदना नगराळे,सरिता राऊत, अनिल बहिरे,अमोल मेंघरे,सचिन चन्ने,विजय सोळंकी यांच्या पथकाने केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

प्राप्त तक्रारींची दखल; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर पातागुडम-सोमनपल्ली महामार्गाच्या दुरुस्तीला गती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील सोमनपल्ली राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेबाबत नागरिकांकडून सातत्याने प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या निर्देशानंतर राष्ट्रीय महामार्ग...

सरकारने सरसकट थकबाकी द्यावी; अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन.. – कंत्राटदार आक्रमक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सरकार केलेल्या कामांची थकबाकी देत नाही; पण नवीन कामे करवून घेत आहे.अश्यातच राज्यभरात विविध विभागातील कामांच्या सुमारे ९० हजार कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे त्रस्त...

देसाईगंज,आरमोरी,कुरखेडा,कोरची व इतर पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांच्या बदल्या..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यांसह उपपोलिस ठाणे व पोलिस मदत केंद्रांतील तब्बल ७२ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत.या संदर्भात काल बुधवारी...

खासगी हॉस्पिटल्सचा संप; रुग्ण सेवा प्रभावित..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (एमएमसी)'सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी' (सीसीएमपी)पूर्ण केलेल्या होमिओपॅथी(बीएचएमएस) डॉक्टरांना नोंदणी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यभरातून वैद्यकीय असंतोषाचा वणवा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!