Thursday, August 6, 2026
Homeगडचिरोलीदोन दिवसांपासून बेपत्ता कर्मचाऱ्याचा नालीत सापडला मृतदेह.. - दारूच्या नशेत नालीत पडल्याचा...

दोन दिवसांपासून बेपत्ता कर्मचाऱ्याचा नालीत सापडला मृतदेह.. – दारूच्या नशेत नालीत पडल्याचा संशय..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-दोन दिवसांपासून घरून बेपत्ता झालेल्या कर्मचाऱ्याचा गडचिरोली शहरातीलच चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरील रिलायन्स पेट्रोलपंपासमोरील नालीत मृतदेह आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली असल्याची घटना काल,शुक्रवारी २९ नोव्हेंबरच्या दुपारी ३ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.धनपाल उर्फ विजेश गजानन भलावी वय ४२ वर्षे,रा.पंचवटीनगर,गडचिरोली असे मृत कर्मचारीचे(अभियंता) नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,धनपाल भलावी हे जिल्हा परिषदेच्या सिरोंचा येथील पाणीपुरवठा विभागात अभियंता म्हणून कार्यरत होते.ते मूळचे गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील रहिवासी असून त्यांचे कुटुंबीय गडचिरोली येथील आयटीआय परिसरातील पंचवटीनगरात पती-पत्नी किरायाने वास्तव्याने होते. त्यांची पत्नी रामटेक येथे नातेवाईकांकडे गेली होती. दरम्यान भलावी हे बुधवारपासून घरी न परतल्याने शेजारच्यांनी याची माहिती त्यांच्या पत्नीला दिली. पत्नीने पती भलावी बेपत्ता असल्याची तक्रार गडचिरोली पोलिस ठाण्यात दिली होती.दरम्यान,काल शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास चंद्रपूर मार्गावरील नाल्यात काही व्यक्तींना त्यांचा मृतदेह आढळून आला.मृतदेहाचे डोके पाण्यात बुडालेल्या अवस्थेत होते.पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेह नालीबाहेर काढला.भलावी यांना दारूचे व्यसन होते. दारूच्या नशेत ते नालीत पडले असावे, यातच त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. घटनेचा पुढील तपास गडचिरोली पोलिस करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पत्नीच्या डोळ्यादेखत वाघाचा हल्ला; पती ठार..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातून एक धक्कादायक घटना आज,गुरुवार ६ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली.दावेझरी गाव नजीकच्या चुल्हारडोह-आग्री जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी...

प्राप्त तक्रारींची दखल; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर पातागुडम-सोमनपल्ली महामार्गाच्या दुरुस्तीला गती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील सोमनपल्ली राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेबाबत नागरिकांकडून सातत्याने प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या निर्देशानंतर राष्ट्रीय महामार्ग...

सरकारने सरसकट थकबाकी द्यावी; अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन.. – कंत्राटदार आक्रमक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सरकार केलेल्या कामांची थकबाकी देत नाही; पण नवीन कामे करवून घेत आहे.अश्यातच राज्यभरात विविध विभागातील कामांच्या सुमारे ९० हजार कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे त्रस्त...

देसाईगंज,आरमोरी,कुरखेडा,कोरची व इतर पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांच्या बदल्या..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध पोलीस ठाण्यांसह उपपोलिस ठाणे व पोलिस मदत केंद्रांतील तब्बल ७२ अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत.या संदर्भात काल बुधवारी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!