- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-भारतीय हत्यार कायद्या अंतर्गत विना परवाना हत्यार बाळगणे गुन्हा असूनही काहीजण याचे उल्लंघन करतांना दिसून येतात.नुकतेच गुन्हेगारीच्या खाईत जाता-जाता दोन तरणेबान युवक चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या हाती गवसले.चंद्रपूरचे पथक शनिवार १९ जुलै रोजी ब्रम्हपुरी पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय माहितीच्या आधारे ब्रम्हपुरी तालुक्याच्या किन्ही गावातील संशयितांच्या घरी पंचासमक्ष छापा टाकला आणि झाडाझडती घेतली असता एक नग देशी बनावटीचा गावठी कट्टा व दोन नग काडतूस अवैधरित्या मिळून आले.प्रकरणी दोन युवकांना अटक करण्यात आली. सदरची घटना ताजी असतांनाच आता परत चंद्रपूर जिल्ह्याच्या राजुरा शहरातील एका १९ वर्षीय तरुणाकडे तलवार आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली.प्रकरणी अकिब नासिर खान वय १९ वर्षे,रा.चुनाभट्टी वार्ड,राजुरा,जि.चंद्रपूर यांस राजुरा पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून ८१ सेंमी लांबीची लोखंडी चमकदार तलवार जप्त केली आहे. आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन राजुरा येथे अपराध क्रमांक-३४६/२०२५ नुसार भारतीय हत्यार कायदा कलम ४,२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राजुरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुमित परतेकी यांच्या नेतृत्वात सुरू आहे.
- Advertisement -

