Thursday, October 22, 2026
Homeनागपूर१८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीशी लैंगिक संबंध ठेवणे बलात्कारच; मग ती विवाहित...

१८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीशी लैंगिक संबंध ठेवणे बलात्कारच; मग ती विवाहित असो,वा नसो… – १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा झालेल्या व्यक्तीची शिक्षा कायम…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावर सुनावणी करतांना,१८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या पत्नीसोबत संमतीसह शारीरिक संबंध ठेवणे हा बलात्कार असल्याचे म्हटले आहे.याशिवाय या गुन्ह्यात १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा झालेल्या व्यक्तीची शिक्षाही न्यायालयाने कायम ठेवली आहे.न्यायमूर्ती जी.ए.सानप यांच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशात,सत्र न्यायालयाच्या २०२१ च्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या २४ वर्षीय व्यक्तीची याचिका फेटाळून लावली.सत्र न्यायालयाने आरोपीला लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या तरतुदींनुसार,त्याच्या अल्पवयीन पत्नीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते.
सत्र न्यायालयाने आरोपीला १० वर्षांची शिक्षा सुनावली होती.याचिकाकर्त्याने दावा केला आहे की, पीडिता त्याची पत्नी असल्याने त्यांच्यातील शारीरिक संबंधांना बलात्कार म्हणता येणार नाही.मात्र,उच्च न्यायालयाने पत्नीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असेल तर तिच्याशी सहमतीने शारीरिक संबंध ठेवण्याच्या आधारावर बचाव होऊ शकत नाही,असे सांगितले.१८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीशी लैंगिक संबंध ठेवणे हा बलात्कार आहे,मग ती विवाहित असो वा नसो,असे खंडपीठाने म्हटले.
२०१९ मध्ये महिलेने तक्रार दाखल केली.दाखल केलेल्या तक्रारीत तिने म्हटले की,ती आरोपीसोबत रिलेशनशिपमध्ये होती.परंतु तिने नकार देवूनही त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि तिला गर्भवती केले असे नमुद केले आहे.यानंतर दोघेही एकत्र राहू लागले आणि लग्न केले.मात्र,पतीने गर्भपात करण्याचा हट्ट धरल्याचे तक्रारीत म्हटले आहे.लग्नाच्या नावाखाली तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केला आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप महिलेने केला आहे.
न्यायालयाने सांगितले की,महिलेने मुलाला जन्म दिला असून डीएनए चाचणीनुसार आरोपी आणि महिला हे जैविक पालक आहेत.तर पतीने आपल्या याचिकेत दोषी नसल्याची कबुली दिली आणि तक्रारदार ही त्याची पत्नी आहे,त्यामुळे त्यांच्यातील शारीरिक संबंधांना बलात्कार म्हणता येणार नाही आणि हे संबंध सहमतीने होते.कथित घटनेच्या वेळी ही महिला अल्पवयीन नव्हती,असा दावाही त्याने केला.मात्र, न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य करण्यास नकार दिला. कागदोपत्री पुराव्यानुसार,तक्रारदाराचा जन्म २००२ मध्ये झाला होता आणि २०१९ मध्ये कथित घटना घडली तेव्हा ती अल्पवयीन होती.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाचा हल्ला; शेतकरी गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांचे सत्र संपता- संपेना,असे चित्र निर्माण झाले आहे.जंगल परिसरात गेलेल्यांना वाघोबा तर सोडतच नाही.अश्यातच वाघ आता चक्क शेतावर जाणाऱ्या शेतकऱ्यांचाही...

पोलीस कर्मचाऱ्याची राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या..!

उद्रेक न्युज वृत्त  अमरावती :-एका तरुण पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज,बुधवार २१ ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास अमरावती शहरात उघडकीस...

पदवीधर मतदारसंघ निवडणूक; आता खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना चार तासांची विशेष सवलत.. -जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडून निवडणूक साहित्य वाटप व्यवस्था व स्ट्राँग रूमची पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी खासगी आस्थापनांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना पूर्वी जाहीर करण्यात आलेल्या दोन तासांऐवजी आता चार...

शाळांना ‘या’ तारखेपासून लागणार दिवाळीच्या सुट्ट्या..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या दिवाळी सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील शाळांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!