Sunday, May 31, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअन् अपक्ष उमेदवाराने उपविभागीय अधिकाऱ्याच्या लगावली कानशिलात.. - संपूर्ण राज्यात पेन डाऊन...

अन् अपक्ष उमेदवाराने उपविभागीय अधिकाऱ्याच्या लगावली कानशिलात.. – संपूर्ण राज्यात पेन डाऊन संप करण्याचा इशारा देताच उमेदवारावर कारवाई करीत १४ दिवसांची कोठडी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राजस्थान पोटनिवडणुकीत
मतदानादरम्यान महसूल अधिकाऱ्याच्या कानशीलात लगावल्या प्रकरणी अपक्ष उमेदवार नरेश मीनाला आज,शुक्रवारी १५ नोव्हेंबरला १४ दिवसांची न्यायालयीन पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. काल,गुरुवारी त्याला अटक करून जयपूरला नेण्यात आले होते.त्याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह १० कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
देवळी-उनियारा विधानसभा मतदारसंघाच्या
पोटनिवडणुकीसाठी बुधवारी १३ नोव्हेंबरला मतदान झाले.यावेळी अपक्ष उमेदवार नरेश मीणा यांनी उपविभागीय दंडाधिकारी(एस डी एम)अमित चौधरी यांना कानशिलात लगावली.याचे महसूल विभागात संतप्त पडसाद उमटले.राजस्थान प्रशासकीय
सेवा अधिकारी संघटनेने नरेश मीणा यांच्या अटकेची
मागणी केली.महसूल अधिकारी व कर्मचारी संघटनांनी मीनाच्या अटकेची मागणी करीत,अटक न झाल्यास गुरुवारपासून संपूर्ण राज्यात पेन डाऊन संप करण्याचा इशारा दिला होता.तर मीना यांनी प्रशासनाला आव्हान देत गावात आंदोलन केले. प्रशासनावर दबाव टाकता यावा म्हणून त्यांनी आपल्या समर्थकांना सामरावता गावात मोठ्या संख्येने लाठ्या-काठ्या घेऊन जमण्यास सांगितले नरेश मीणा समर्थकांना आवर घालण्यासाठी पाच पोलिस ठाण्यांमधून पोलिसांना पाचारण करावे लागले.यावेळी हिंसाचार आणि जाळपोळ झाल्यानंतर नरेश मीणा आणि त्यांच्या १०० हून अधिक समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.मात्र,नंतर मीना पोलिसांच्या ताब्यातून फरार झाला.या घटनेनंतर आरएएसच्या अधिकाऱ्यांनी नरेश मीणाला अटक करण्याची मागणी केली.त्याचवेळी मीना यांनी प्रशासनाला आव्हान देत आंदोलन केले,तसेच त्याच्या समर्थकांना लाठी-काठी घेऊन जमण्यास सांगितले. या घटनेनंतर राजस्थानच्या टोंकमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला होता.अमित चौधरी हे राजस्थान प्रशासकीय सेवेचे अधिकारी आहेत.ते सध्या टोंक जिल्ह्यातील मालपुरा येथे एसडीएम आहेत.अमित चौधरी हे राजस्थानमधील २०१९ बॅचचे अधिकारी आहेत.अमित चौधरी हे मूळचे अलवर येथील आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धानोरा व एटापल्ली तालुक्यात २० हजार धुररहित चुलींचे वितरण.. -दरवर्षी ४१ हजार टनांहून अधिक जळाऊ लाकडाची होणार बचत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शन व पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा व एटापल्ली या दुर्गम,आदिवासी तालुक्यांमध्ये राबविण्यात आलेल्या धुररहित चुल उपक्रमाला उल्लेखनीय...

चार दिवसांत उष्माघाताचे तब्बल १८ जण बळी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या नवतपाचे दिवस सुरू आहेत.२५ मे २०२६ पासून सुरू झालेली सूर्याची दाहकता २ जून २०२६ पर्यंत राहणार आहे.अश्यातच भयंकर तापणाऱ्या नवतप्याने...

हाताची दोन बोटे दाखवून सेल्फी काढत असाल तर सावधान..!

उद्रेक न्युज वृत्त :-डिजिटल युगात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होतांना दिसून येत आहे.काही कालावधीपासून डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून नागरिकांची लाखो रुपयांपासून ते कोट्यवधी रुपयांची फसवणूक...

‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ व ‘उच्चरक्तदाब दिना’ निमित्त पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' आणि 'जागतिक उच्चरक्तदाब दिना'चे औचित्य साधून गडचिरोली येथे एक विशेष आरोग्य जनजागृती आणि तपासणी शिबिर उत्साहात पार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!