Monday, September 21, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्त१५ हजाराची लाच भोवली; सहाय्यक वनसंरक्षकासह लिपिक एसीबीच्या जाळ्यात..

१५ हजाराची लाच भोवली; सहाय्यक वनसंरक्षकासह लिपिक एसीबीच्या जाळ्यात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-लाकूड विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकाकडून झाडांची कटाई,लाकूड वाहतूक व विक्री करण्यासाठी कोणतीही कारवाई न करता लाकूड विक्रीचा व्यवसाय सुरळीत चालू देण्यासाठी वार्षिक ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडी अंती लाचेचा पहीला हप्ता म्हणून १५ हजार रूपये स्विकारतांना बुलढाणा वन विभागाच्या एका महिला सहाय्यक वनसंरक्षकासह कनिष्ठ लिपिकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे.प्रकरणी दोन्ही लाचखोरांवर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अश्विनी बंसत आपेट, वय ३५ वर्षे,पद-सहाय्यक वनसंरक्षक(ACF), वर्ग-१,सहाय्यक वनसंरक्षक कार्यालय,वनविभाग, बुलढाणा.ह.मु.राजमाता नगर,सेट जोसेफ इंग्लीश स्कूलच्या मागे,सुंदरखेड ता.जि.बुलढाणा.मुळ राहणार मु.पो. गिरवली ता.अंबेजोगाई,जि.बिड व अमोल वसंत मोरे, वय ३८ वर्षे,पद-कनिष्ठ लिपिक,वर्ग-३,सहाय्यक वनसंरक्षक कार्यालय,वनविभाग,बुलढाणा.रा.वैजनाथ नगर,चिखली रोड,जित स्पोर्टच्या मागे,ता.जि. बुलढाणा असे लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्याचे नाव आहे.
प्रकरणातील तकारदार यांचा शेतामधील झाडांची खरेदी करून,त्या झाडाची कटाई करणे व सदर झाडाचे लाकूड हे आरामशीन व्यापारी यांना विक्री करण्याचा व्यवसाय असल्याने त्यांना झाडांची कटाई, वाहतूक व विक्री करण्यासाठी वन विभागाची रीतसर परवानगी घ्यावी लागते.यासाठी तक्रारदार यांनी परवानगी मागितली असता झाडांची कटाई,वाहतूक व विक्री करण्यासाठी कोणतीही कारवाई न करता सुरळीत चालू देण्यासाठी सहाय्यक वनसंरक्षक व त्यांचे कार्यालयातील लिपिक अमोल मोरे हे ३० हजार रूपये वार्षिक स्वरूपात लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलढाणा यांच्याकडे प्राप्त झाली होती.त्यानुसार, ३१ डिसेंबर २०२५ रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली.पडताळणीत ३० हजार रुपयांपैकी १५ हजार रुपये देण्याचे ठरले.त्यानुसार,सहाय्यक वनसंरक्षक यांचे दालनामध्ये तक्रारदार यांचेकडून १५ हजार रूपये लाचेचा पाहीला हप्ता स्विकारतांना दोघांनाही रंगेहात पकडण्यात आले.
सदरची कारवाई बापू बांगर,पोलीस अधिक्षक,ॲन्टी करप्शन ब्युरो,अमरावती,परिक्षेत्र,सचिंद्र शिंदे,अप्पर पोलीस अधिक्षक,ॲन्टी करप्शन ब्युरो,अमरावती, परिक्षेत्र,भागोजी बोरमले,पोलीस उपअधिक्षक,ॲन्टी करप्शन ब्यूरो,बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी रमेश पवार,पोलीस निरीक्षक विलास गुसिंगे, पोलीस निरीक्षक व सफी शाम भांगे,पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रविण वैरागी,राजेद्र क्षिरसागर,दिपक जाधव, अमोल झिने,पोलीस नाईक जगदीश पवार,पोकों, गजानन गाल्डे,रंजीत व्यवहारे,शैलेश सोनवणे, मपोकों स्वाती वाणी,चापोहेका नितीन शेटे,अर्शद शेख सर्व ॲन्टी करप्शन ब्यूरो,बुलडाणा यांनी पार पाडली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.राज्यात पावसाने घेतलेली...

सिंदेवाही प्रेस क्लबची नवीन कार्यकारिणी घोषित; अध्यक्षपदी प्रशांत गेडाम यांची निवड..

उद्रेक न्युज वृत्त  सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रेस क्लब सिंदेवाहीची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.यामध्ये अध्यक्षपदी प्रशांत गेडाम, उपाध्यक्षपदी संतोष नन्नावार तर सचिवपदी सुधाकर गजभिये यांची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!