Monday, August 31, 2026
Homeनागपूरस्टंटबाजी करणे पडले महागात; दोन तरुणांचा मृत्यू..

स्टंटबाजी करणे पडले महागात; दोन तरुणांचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-दुचाकीने स्टंटबाजी करणे दोन तरुणांच्या जीवावर बेतल्याची घटना नागपूर शहराच्या वर्धा मार्गावरील जनता चौक ते बजाजनगर चौक दरम्यान १६ फेब्रुवारीच्या रात्री उशिरा घडली.दोन्ही तरुण जीटी बुलेटवरून चौकातून वेगवान फेऱ्या मारत होते. प्रत्यक्षदर्शींच्या मते,दोन्ही तरुणांनी दोनदा जनता चौक ते बजाजनगर या मार्गावरून सतत स्टंटबाजी केली आणि विष्णूजी की रसोई समोरून जात असतांना त्यांनी एका महिला दुचाकीस्वाराला कट मारण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा बुलेटवरील ताबा सुटला आणि बुलेट रस्त्याच्या कडेला असलेल्या पिलरवर जाऊन जोरदार आपटली.यात युग विशाल चनकापूरे वय १९ वर्षे व रुद्र शशिकांत सोमकुंवर वय १९ वर्षे दोघेही रा.काचीपुरा, नागपूर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्यांना रामदासपेठ येथील खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.मृतक दोन्ही तरुण चांगले कबड्डीपटू असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.घटनेचा पुढील तपास  बजाजनगर पोलीस ठाणे करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; ७ लाख ३८ हजार ३०१ मतदारांवर शिक्कामोर्तब.. – २७ हजार ४१४ ‘जुळवणी न झालेले मतदार’; तर ५६...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण(एसआयआर) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित गडचिरोली जिल्ह्याची प्रारूप...

शासकीय आदिवासी वसतिगृहांच्या खासगीकरणाचे आरोप तथ्यहीन.. – राज्यातील ४९० शासकीय वसतिगृहांतील विद्यार्थ्यांसाठी १८ प्रकारचे उपक्रम मोफत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागाच्या शासकीय विद्यार्थी वसतिगृहांचे खासगीकरण करण्यात येत असल्याचे किंवा वसतिगृहांचे व्यवस्थापन खासगी संस्थेकडे सोपविण्यात आल्याचे आरोप तथ्यहीन आहेत. वसतिगृहांची...

आज आमदार मसराम यांच्या नेतृत्वात काँग्रेसचा देसाईगंज उपविभागीय कार्यालयावर धडकला महामोर्चा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी,कष्टकरी,आदिवासी,निराधार व बेरोजगारी,महागाईने तसेच स्मार्ट मिटरने त्रस्त नागरीकांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज,सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आरमोरी विधानसभा...

जंगली हत्तींच्या हैदोसाने शेतकरी त्रस्त..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील विविध परिसरात सलग तीन दिवसांपासून जंगली हत्तींनी शेतशिवारातील धानपिकात धुमाकूळ घालून मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने जंगली हत्तींच्या हैदोसाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!