- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-टी.एम.जी.क्रीयेशन्स आणि इनोव्हेटिव्ह मानबिंदू प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ललकारी सन्मानाची अनुभूती महा गौरव संमेलनात साहित्यिक रोहिणी पराडकर यांना राज्यस्तरीय अनुभुती जनसेवा सन्मान पुरस्काराने नुकतेच मुंबई येथे सन्मानित करण्यात आले आहे.
रोहिणी पराडकर ह्या उत्कृष्ट साहित्यिक असून साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावल्या बद्दल राज्यस्तरीय अनुभुती जनसेवा सन्मान पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत.सदरचे पुरस्कार
डॉ.सादिका नवाब सहर जेष्ठ साहित्यिका हिन्दी विभाग प्रमुख मुंबई विश्वविद्यालय यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.पुरस्कार प्रदान करतेवेळी कर्नल रविंद्र त्रिपाठी,जेष्ठ अभिनेत्री नयना आपटे,डॉ.शुभदा नील, बॉलीवूड अभिनेता अभंष कुमार उपस्थित होते. सदरचे कार्यक्रम पत्रकार भवन महापालिका मार्ग सीएसटीएम मुंबई येथे नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाचे आयोजन एन.डी.खान संस्थापक(एमएल केएस एस/एबीएफ) व सलमा एन.खान संचालिका
टी.एम.जी.क्रियेशन यांनी केले.या कार्यक्रमास राज्याच्या विविध भागातील साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- Advertisement -

