Saturday, April 18, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तपंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मुख्यमंत्री फडणवीसांवर स्तुती सुमने..! - गडचिरोलीतील कार्याचे केले कौतुक..

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मुख्यमंत्री फडणवीसांवर स्तुती सुमने..! – गडचिरोलीतील कार्याचे केले कौतुक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल बुधवारी गडचिरोली जिल्ह्यातील दौऱ्यादरम्यान विविध कार्यक्रमांना हजेरी लावली.या वेळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ११ जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले.यात ८ महिला आणि ३ पुरुष आहेत.यात दोन दांपत्ये असून या ११ जणांवर महाराष्ट्रात १ कोटीपेक्षा अधिकचे बक्षीस होते.छत्तीसगड सरकारनेही त्यांच्यावर बक्षीस जाहीर केले होते.यात दंडकारण्य झोनल कमिटीच्या प्रमुख आणि भूपतीची पत्नी ताराक्का आहे.३४ वर्षांपासून त्या नक्षली चळवळीत आहेत.३ डिव्हिजन कमिटी मेंबर तर १ उपकमांडर,२ एरिया कमिटी मेंबर आहेत.या सर्वांना पुढचे जीवन जगण्यासाठी ८६ लाख रुपये आर्थिक मदत देण्यात आली.निवडणूक आचारसंहितेच्या काळात ५ नक्षली ठार झाले.२०२४ या वर्षांत २४ नक्षली ठार झाले आणि १८ माओवाद्यांना अटक करण्यात आली.गेल्या ६ महिन्यांत १६ जहाल नक्षलवादी आणि काल ११ असे २७ जण मुख्य प्रवाहात आले आहेत.या सर्व प्रयत्नांमुळे मोदींनी राज्य सरकारचे कौतुक केले आहे.
या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका पोस्टच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे कौतुक केले आहे.यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महाराष्ट्र सरकार करीत असलेल्या प्रयत्नांचे मी कौतुक करतो.यामुळे जीवन सुलभतेला निश्चितच चालना मिळेल आणि आणखी प्रगती साधण्याचा मार्ग प्रशस्त होईल. गडचिरोली आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशातील माझ्या बंधू भगिनींचे विशेष अभिनंदन !’
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोहफुले वेचत असतांनाच बिबट्याचा हल्ला.. – जंगलशिवारात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीटातील एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

उष्णतेचा कहर; उद्याला नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वाढत्या उष्णतेच्या लाटेचा कहर लक्षात घेता नागपूर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने उद्या,शनिवार १८ एप्रिल रोजी नागपूर...

खताचा काळाबाजार भोवला; देसाईगंजच्या कृषी केंद्र संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदानित डीएपी खत(DAP)अनधिकृतरीत्या जिल्ह्याबाहेर विकणे,खताचा काळाबाजार करणे तसेच शासकीय ई-पॉस(e-POS) प्रणालीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी देसाईगंज येथील मे.नाकाडे कृषी केंद्रचे संचालक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!