Saturday, August 1, 2026
Homeगोंदियासावधान..! गॅस सिलिंडरमधून गॅस काढून रिकाम्या सिलिंडरमध्ये भरतांना दोघे सापडले.. - हंड्यात...

सावधान..! गॅस सिलिंडरमधून गॅस काढून रिकाम्या सिलिंडरमध्ये भरतांना दोघे सापडले.. – हंड्यात तब्बल अडीच किलो गॅस कमी; वजन काटा करूनच गॅस खरेदी करा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-अनेकजण घरगुती गॅस सिलेंडर खरेदी करतांना वजन काटा न करताच गॅस घरी आणत असतात.त्यामुळे काही महिन्यांतच गॅस संपल्याची ओरड सुरू होते.अशी ओरड सुरू होणे साहजिकच आहे; कारण की,अनेकदा ग्राहकांच्या घाई-घडबडीचा फायदा घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे.नफेखोरीसाठी कोण? कुठल्या स्तरावर जाऊन पोहचेल हे सांगता येत नाही; असाच प्रकार गोंदिया जिल्ह्यात उघडकीस आला आहे.घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरमधून गॅस काढून रिकाम्या सिलिंडरमध्ये रिफिलींग करीत असतांना पोलिसांनी दोघांना रंगेहाथ पकडले आहे. रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम गोंडीटोला येथील इंडेन गॅस कंपनीच्या गोदामात दोन दिवसांपूर्वी म्हणजेच शुक्रवारी दुपारी ३ वाजता कारवाई करण्यात आली.
गॅस सिलिंडरमधून गॅस काढून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे प्रकार वाढले असून,तसे प्रकार उघडकीस सुद्धा आले आहेत.यातूनच रामनगर पोलिसांनी ग्राम गोंडीटोला येथील इंडेन गॅस कंपनीच्या गोदामावर धाड टाकली.तेथे आरोपी सुरेश राजाराम परतेती वय ३२ वर्षे,रा.गोंडीटोला व सुरेश दुलीचंद दमाहे वय ३२ वर्षे,स्कूलटोली-हिवरा हे दोघे ग्राहकांना वितरित करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या भरलेल्या सिलिंडरला इलेक्ट्रिक मोटार लावून रेग्युलेटरच्या सहाय्याने काही प्रमाणात गॅस काढून रिकाम्या सिलिंडरमध्ये भरून काळाबाजार करतांना आढळले.
तहसील कार्यालयातील कनिष्ठ लिपिक हेमराज वसंत शहारे वय ३९ वर्षे यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी जीवनावश्यक वस्तू अधिनियम कलम ३,७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अमोल वाघमोडे करीत आहेत.
गॅस सिलिंडर खरेदी करतांना त्याचे वजन केले का?, सिलिंडर घेतांना वजन करा.आपल्या गॅस हंड्यात तब्बल अडीच किलो गॅस कमी असतो.या प्रकरणानंतर आता हा प्रकार उघडकीस आला असून,आता सिलिंडर घेतांना त्याचे वजन करूनच घेणे गरजेचे झाले आहे.गॅस सिलिंडर देताना ग्राहकांना त्याची पावती देणे अनिवार्य आहे.मात्र,सिलिंडर देतांना ग्राहकांना पावती दिली जात नाही.अशांवर आता कारवाई करण्याची गरज आहे.गॅस सिलिंडर वाटप करणाऱ्या व्यक्तींनी वजन काटा व गॅस लिकेज मशीन सोबत ठेवणे अपेक्षित आहे.गॅस सिलिंडर वाटप करणाऱ्यांकडे वजन काटा व लिकेज मशीन उपलब्ध नसते.त्यामुळे काळाबाजार करणाऱ्यांचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे; यावर त्वरित आळा घालण्याची मागणी केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सामाजिक वनीकरण विभागाचा विभागीय वन अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  बीड :-तक्रारदारास तंबी देऊन तब्बल ४५ लाख रुपयांची लाच स्वीकारतांना बीड जिल्ह्याच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वन अधिकाऱ्यास(DFO)छत्रपती संभाजीनगरच्या लाच लुचपत प्रतिबंधक...

क्रिकेटपटू तरुणीने उचलले टोकाचे पाऊल; गळफास घेऊन संपवले जीवन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-क्रिकेटच्या मैदानावर मोठे नाव कमावण्याची स्वप्ने उराशी बाळगणाऱ्या एका १७ वर्षीय क्रिकेटपटू तरुणीने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना नागपूरच्या बजाजनगर पोलिस...

नव्या परिस्थितीनुसार आपत्ती व्यवस्थापनाची कार्यपद्धती विकसित करण्याची गरज.. -नदीकाठील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्या-सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बदलत्या हवामानामुळे अल्प कालावधीत अतिवृष्टी होऊन पूरस्थिती निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी अधिक सक्षम करण्यावर भर देण्याचे निर्देश सहपालकमंत्री...

जिल्हा परिषदांसह मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार एकाचवेळी होण्याची शक्यता..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील ५० टक्के ओबीसी आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या तब्बल २२ जिल्हा परिषदांच्या निवडणूका अद्यापही रखडल्या आहेत.विशेष म्हणजे,ज्या ठिकाणी मर्यादा ओलांडल्या गेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!