Thursday, October 8, 2026
Homeनागपूरसात दिवसांपासून दहावीची विद्यार्थिनी बेपत्ता..

सात दिवसांपासून दहावीची विद्यार्थिनी बेपत्ता..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-शाळेत जात असल्याचे सांगून घराबाहेर पडलेली इयत्ता दहावीची विद्यार्थिनी बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना भिवापूर तालुक्याच्या थुटानबोरी (पुनर्वसन)येथे समोर आली आहे.जवळपास सात दिवस लोटले तरी तिचा थांगपत्ता लागलेला नसल्याने  परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.कुणीतरी अज्ञात व्यक्तीने तिला आमिष दाखवून पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.या प्रकरणी भिवापूर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोधमोहीम सुरू केली आहे.
लक्ष्मण भय्याजी बोरसरे रा.थुटानबोरी(पुनर्वसन) यांची १५ वर्षीय मुलगी सलोनी ही जवळच्याच सालेभट्टी येथील प्रियवंदा विद्यालयात इयत्ता १० व्या वर्गात शिकते.ती गत १९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास शाळेत जाण्यासाठी घरातून निघाली होती.मात्र,शाळा सुटल्यानंतरही सायंकाळपर्यंत ‘ती’ घरी परतली नाही.त्यामुळे चिंतातुर झालेल्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला.शोध घेऊनही सलोनीचा कुठेही पत्ता लागला नाही.अखेर वडील लक्ष्मण यांनी भिवापूर पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. “माझी मुलगी स्वतःहून कोठेही निघून जाणारी नसून,कुणीतरी अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून पळवून नेले,” असा संशय तक्रारीत व्यक्त केला आहे.पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७(२)अन्वये गुन्हा दाखल करून,भिवापूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयप्रकाश निर्मल यांनी शोधकार्य सुरू केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सिने सृष्टीवर शोककळा; ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन.. – ज्येष्ठ अभिनेते आणि माझे निकटचे मित्र नाना पाटेकर यांची अशी अकाली आणि अचानक ‘एक्झिट’...

उद्रेक न्युज वृत्त :-ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज,गुरुवार ८ ऑक्टोंबर रोजी पहाटेच्या सुमारास वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यात निधन झाले.गोव्यातील डोना पौला येथील...

महाराष्ट्रातील गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी; मुख्यमंत्र्यांनी घेतली अमित शाह यांची भेट..

उद्रेक न्युज वृत्त  नवी दिल्ली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यात आज,बुधवार ७ ऑक्टोंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.या भेटीत...

नक्षलवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रसाठा व स्फोटक साहित्ये जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोलीच्या महाराष्ट्र व छत्तीसगडच्या नारायणपूर सीमेलगत असलेल्या भामरागड तालुक्यातील कोपर्शी जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रसाठा व स्फोटक साहित्ये गडचिरोली पोलिसांनी...

पोलीस उपनिरीक्षकाने राहत्या घरीच संपवले जीवन..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-एका पोलीस उपनिरीक्षकाने आपल्या राहत्या घरी बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.निलेश भाऊसाहेब पाटील वय ५५ वर्षे असे मृत पोलिस उपनिरीक्षकाचे नाव...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!