Wednesday, September 9, 2026
Homeगडचिरोलीवळण मार्गावर कारची समोरासमोर धडक; एकाचा जागीच मृत्यू..

वळण मार्गावर कारची समोरासमोर धडक; एकाचा जागीच मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-वळण मार्गावर दोन कार एकमेकींना धडकून झालेल्या अपघातात एका शालेय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला,तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना आज,रविवार २५ जानेवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील धानोरा-मुरुमगाव मार्गावरील जपतलाई गावाजवळ घडली.अपघातात रोशन राजू किरंगे वय १२ वर्षे,रा.गोडलवाही,ता.धानोरा, जि.गडचिरोली याचा जागीच मृत्यू झाला असून तो गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील येरंडी येथील मालिनीताई दहिवडे अनुदानित आश्रम शाळेचा विद्यार्थी होता.तर दुसऱ्या कारमधील निधी गुप्ता वय ४३ वर्षे,रा.मोहला,छत्तीसगड असे गंभीर जखमी महिलेचे नाव आहे.
उद्याच्या २६ जानेवारीच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना घेऊन जाण्यासाठी स्कॉर्पिओ कार धानोरा तालुक्याच्या
जपतलाई मार्गे गोडलवाहीकडे निघाली होती.
जपतलाईच्या नागमोडी वळणावर जाताच धानोरा कडून सीजी ०४ पीजी ७८९६ क्रमांकाची टाटा कार स्कॉर्पिओला येऊन धडकली.धडक इतकी भीषण होती की,स्कॉर्पिओ कारचा सोरील भाग चेंदामेंदा होऊन कार पलटी झाली.तर टाटा कार रस्त्याच्या कडेला झाडाला जाऊन धडकली.अपघात घडताच मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत पलटी झालेल्या स्कॉर्पिओ कार मधील जखमींना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.मात्र,यात शालेय विद्यार्थ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.तर टाटा कार मधील पती व मुलाला किरकोळ दुखापत झाली.मात्र,पत्नी निधी गुप्ता या गंभीर जखमी झाल्या.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत घटनेचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कुलरमध्ये पाणी भरणे जीवावर बेतले; एकाचवेळी दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-कित्येकदा कुलर सुरू असतांना वा कुलरची बोर्डमध्ये लावलेली पिन न काढता कुलरमध्ये पाणी भरणे अनेकांच्या जीवावर बेतले आहे.बऱ्याच नागरिकांना कुलरच्या विद्युत प्रवाहाचा...

ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारली ‘जनकल्याणम्’ अभ्यासिका.. – आरमोरी तालुक्याच्या पळसगाव येथील उपक्रमाचे कौतुक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक सुविधा गावातच उपलब्ध करून देण्यासाठी आरमोरी तालुक्यातील पळसगाव येथे ग्रामस्थांनी लोकसहभागातून उभारलेली...

आत्मसमर्पित नक्षल भुपतींच्या नियुक्तीसंदर्भात कुलगुरूंचे स्पष्टीकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आत्मसमर्पित नक्षल वेणूगोपालराव ऊर्फ भुपती यांच्या गोंडवाना विद्यापीठातील एकल ग्रामसभा प्रशिक्षण केंद्रात समन्वयक म्हणून झालेल्या नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे...

शालेय शिक्षण मंत्री गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर.. – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या अंमलबजावणीचा घेणार आढावा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे उद्या,बुधवार ९ सप्टेंबर व १० सप्टेंबर २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून,या दौऱ्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!