नागपूर :-आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे.जो स्पर्धेत टिकला तो समोर खूप काही शिकला.बऱ्याच परीक्षांचे व निकालांचे अनेक विद्यार्थी टेन्शन घेतांना दिसून येतात.मात्र,अशीही एक विद्यार्थिनी जिने चक्क सातव्या वर्गाच्या निकालाचे टेन्शन घेत घर सोडले.स्वतः घर तर सोडले सोबतच तिने आपल्या चार वर्षाच्या बहिणीलादेखील सोबत घेतले.अशातच घरचे रागावणार म्हणून घरी न जाता तिने तब्बल तीन तास शहरात चकरा मारल्याची घटना नागपूर शहरातील नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन दिवसांपूर्वी म्हणजेच गुरुवारी घडली.यामुळे घरच्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.गुरुवारी १ मे ला महाराष्ट्र दिन तथा कामगार दिन असल्याने सर्वत्र शासकीय सुट्टी होती.त्यामुळे काही शाळेतील शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे निकाल २ मे म्हणजेच काल शुक्रवारी लागणार होते.अशातच १२ वर्षीय मुलीचा सातव्या इयत्तेचा निकाल काल, शुक्रवारी २ मे ला लागणार होता.यामुळे तिला तणाव आला होता.त्यामुळे ती तिच्या चार वर्ष वयाच्या बहिणीला घेऊन सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास आजी-आजोबांसोबत उद्यानात खेळायला जात आहे; असे सांगून घरातून निघाली.मुली उशिरापर्यंत घरी परत न आल्याने घरच्यांनी शोध घेतला.मात्र,कुठेही पत्ता न लागल्याने शेवटी पालकांनी नंदनवन पोलिस ठाण्यात तक्रार केली व सोशल माध्यमांमध्ये माहिती शेअर करण्यात आली.तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले.मुली राधाकृष्ण गार्डन ईश्वरनगर, गुरुदेवनगर,तिरंगा चौक,गजानन चौक,हेडगेवार चौक,जनरल आवारी चौक या मार्गाने पायी जात असल्याचे फुटेजमध्ये दिसून आले.त्या रेल्वेस्थानकात असल्याची माहिती मिळाल्यावर सहाय्यक पोलिस आयुक्त नरेंद्र हिवरे हे पथकासह होम प्लॅटफॉर्मवर पोहोचले.तेथे त्यांना मुली सुखरूप आढळल्या.त्यांना नंदनवन पोलीस ठाण्यात नेण्यात आले.त्यानंतर त्यांना त्यांच्या पालकांच्या हवाली करण्यात आले.सदरची कार्यवाही वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयवंत पाटील, राहुल शिरे,मुकुंद ठाकरे,पोलिस निरीक्षक कमलाकर गड्डीमे,दिगंबर बोरकर यांच्या पथकाने केली.
सातवीच्या निकालाचा टेन्शन घेत १२ वर्षीय मुलीने घर सोडले.. – जातांना चार वर्षाच्या बहिणीलादेखील घेतले सोबत..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
घरचे रागावतील म्हणून रेल्वे स्थानकात👇
सायंकाळी सहा ते नऊ या कालावधीत त्या नागपुरातील रस्त्यांवर चालत होत्या.मात्र आता इतक्या उशिरा घराकडे परत गेलो तर घरचे रागावतील अशी भीती वाटली.त्यामुळे मुलगी चिमुकल्या बहिणीला घेऊन रेल्वे स्थानकाच्या आत जाऊन बसली.पोलिसांनी तिला विचारणा केली असता सुरुवातीला तिने अज्ञात व्यक्तीने कारमध्ये बसविल्याची बतावणी केली.मात्र त्यानंतर तिने सत्य सांगितले.ते ऐकून पोलिसांनादेखील आश्चर्याचा धक्काच बसला.
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

