Tuesday, May 26, 2026
Homeगोंदियासमोरच्या ट्रकला मागेहून दुसऱ्या ट्रकची धडक; चालक,वाहक घटनास्थळीच ठार..

समोरच्या ट्रकला मागेहून दुसऱ्या ट्रकची धडक; चालक,वाहक घटनास्थळीच ठार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-समोरच्या ट्रकला भरधाव वेगात असलेला ट्रक धडकून चालक व वाहक ट्रकमध्येच ठार झाल्याची घटना मासुलकसा घाट जवळ काल शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली.धडक इतकी भयानक होती की,यात चालक साजिद खान वय ३८ वर्षे व वाहक सादाब खान वय २८ वर्षे यांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला.
माहितीनुसार,मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील कोहमारा ते देवरीदरम्यान वन्यजीवांच्या सुरक्षेच्यादृष्टीने चार भूमिगत पूल तयार करण्यात येत आहे.हे काम रायपूर येथील अग्रवाल ग्लोबल कंपनीला देण्यात आले आहे.कंपनीतर्फे सुरुवातीपासूनच बांधकाम करतांना कसल्याही प्रकारे तांत्रिकदृष्ट्या उपाययोजना करून काम केले जात नाही.त्यामुळे अनेक अपघात झाले.काल शुक्रवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास मासुलकसा घाटात पुलाचे बांधकाम सुरू होते.त्यामुळे वाहतूक एका बाजूने वळविण्यात आली होती.वाहतूक वळवितांना कसलेही तारतम्य न बाळगता सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजना करण्यात आली नव्हती. त्यामुळे ३ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी नागपूरकडून रायपूरच्या दिशेने जाणारा सीजी-४/जेडी-८०४९ क्रमांकाच्या ट्रकचालकाने एकेरी वाहतूक असलेल्या पुलावर करकचून ब्रेक मारला.त्याचवेळी मागून येत असलेल्या आरजे-१४/जीएच-१८९१ क्रमांकाच्या ट्रकने समोरील ट्रकला जोरदार धडक दिली.यात आरजे-१४/ जीएच-१८९१ क्रमांकाच्या ट्रकचा चालक साजिद खान वय ३८ वर्षे आणि वाहक सादाब खान वय २८ वर्षे या दोघांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला.हा अपघात अग्रवाल ग्लोबल कंपनीच्या दुर्लक्षामुळे झाल्याचा आरोप होत आहे.चार दिवसांपूर्वी अशाच प्रकारामुळे देवरी येथील बापलेकीचा मृत्यू झाला होता.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपुरात वाहनांच्या चोऱ्या करायचे अन् लाखनीत विकायचे; तिघांना बेड्या..

उद्रेक न्युज  नागपूर :-भंडारा जिल्ह्याच्या लाखनी परिसरात कार्यरत असलेल्या सराईत वाहन चोरांच्या टोळीचा नागपूर गुन्हे शाखा युनिट-एकच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या...

विद्यार्थ्यांना आता कोरोना काळासारखेच ऑनलाईन शिक्षणाचे धडे मिळण्याची शक्यता.. – इंधन दरवाढीचा परिणाम..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-'थेंबे थेंबे तळे साचे' या म्हणीप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांनी सर्वसामान्यांना मोठा झटका देण्यास सुरुवात केली आहे.पेट्रोल आणि डिझेलच्या दरात...

आता वाघही पडणार गोंधळात; हल्ला करायचा की नाही?..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-हल्ली सर्वत्र वाघांची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.वाघ केव्हाही हल्ला करून जिविनिशी ठार करू शकतो.यासाठी भंडारा जिल्ह्याच्या लाखनी परिसरात वाघांचे हल्ले...

अखेर बदल्यांचे सुलतान तुकाराम मुंढेनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा स्वीकारला पदभार..

उद्रेक न्युज वृत्त मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आज,सोमवार २५ मे रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!