- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-चिचपल्ली वनविभागाच्या मूल येथील कक्ष क्रमांक-७५२ मध्ये रविवारी शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर वाघाने हल्ला केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांनाच परत पुन्हा काल,मंगळवारी दिनांक-२० ऑगस्टला सावली वनपरीक्षेत्रांतर्गत येत असलेल्या सिर्सी बिटातील कक्ष क्र.१९६ राखीव वनक्षेत्रात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली.दिवाकर नत्थू आवळे वय ५० वर्षे रा. सिर्सी असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
नेहमीप्रमाणे गुराखी हा शेळ्या चराईसाठी जंगलात गेला होता.दुपारच्या सुमारास दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला केला.साथीदाराने आरडाओरड केल्याने वाघाने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी पाहणी केली असता गुराखी मृतावस्थेत आढळून आला.गावकऱ्यांनी घटनेची माहिती वनविभागाला दिली.सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे,क्षेत्र सहाय्यक कोडापे,पोलिस विभागातील पीएसआय मुसळे व विजय कोटनाके आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणी करीता सावलीचे ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. मृतकाच्या कुटुंबाला वनविभागाकडून २५ हजार रुपयांची तात्काळ मदत देण्यात आली.
दिवसेंदिवस चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहेत.या घटनांमुळे गुरेचराई करणाऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
- Advertisement -

