Sunday, October 25, 2026
Homeभंडाराशेतशिवारातून विद्युत पुरवठा खंडित करून ॲल्युमिनियम तार चोरी करणारे गजाआड…

शेतशिवारातून विद्युत पुरवठा खंडित करून ॲल्युमिनियम तार चोरी करणारे गजाआड…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा :- साकोली लगतच्या सेंदुरवाफा येथे चक्क विद्युत कंत्राटदाराच्या घरी चोरीच्या विद्युत तार आढळून आल्याचा धक्कदायक प्रकार शुक्रवारी  उघडकीस आला.पोलिसांनी १८ लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त करून याप्रकरणी ५ आरोपींना अटक केली आहे.पो.स्टे.अड्याळ,लाखांदूर,साकोली,सिहोरा हद्दीतून शेतशिवारातून विद्युत पुरवठा खंडित करून ॲल्युमिनियम तार चोरी केला होता.या घटनेचा छडा लावण्याचे मोठे आवाहन पोलिसांसमोर उभे होते. त्यादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीवरून सेंदुरवाफा येथे वीज कंत्राटदार सचिन कटकवार याच्या घरी चोरीचा विद्युत तार ठेवण्यात आला आहे.त्यानुसार  पोलिसांनी छापा टाकून मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता अन्य आरोपींच्या मदतीने ॲल्युमिनियम तार चोरी केल्याची कबुली दिली.पोलिसांनी सचिन कटकवार रा.सेंदुरवाफा,निखील मडावी रा.सानगडी, परवेज मस्जिद अगवान रा.आमगाव/बु.,तुषार लांजेवार व गोलू उके दोन्ही रा.पळसगाव ता.साकोली यांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी १८ लाख ३६ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेली दोन कार जप्त केल्या.सर्व आरोपींना पुढील कारवाईकरिता कारधा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.सदर कारवाई पो.नि.नितीन चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनात पोउपनि तुरकुंडे पोहवा नितीन महाजन,राजेश पंचबुद्धे,संदीप मते, आशिष श्रावणकर,पंकज भित्रे,मंगेश माळोदे यांनी केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात अंगणवाडी शिक्षिकेचा मृत्यू; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यात वाघाची दहशत पसरल्याचे दिसून येत आहे. काल शनिवारच्या सायंकाळी सिंदेवाही शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पळसगाव जाट...

बापरे..! भाडेकरूच्या खोलीत आढळल्या लाखोंच्या बनावट नोटा..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.चक्क भाडेकरूच्या खोलीत लाखोंच्या बनावट नोटा आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पळसगाव जाट येथील शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल शनिवारच्या सायंकाळी...

आज चंद्राच्या लख्ख प्रकाशाची अनुभूती देणारी कोजागरी पौर्णिमा..

उद्रेक न्युज वृत्त :-धार्मिक श्रद्धा,कौटुंबिक स्नेह आणि सांस्कृतिक परंपरांचा संगम असलेल्या शरद ऋतूच्या प्रसन्न वातावरणात चंद्राच्या लख्ख प्रकाशाची अनुभूती देणारी कोजागरी पौर्णिमा आज,रविवार २५...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!