Friday, September 25, 2026
Homeपुणेशेतकऱ्यांना जास्त दराने बियाणे व खतांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर दाखल होणार फौजदारी...

शेतकऱ्यांना जास्त दराने बियाणे व खतांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर दाखल होणार फौजदारी खटले…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

पुणे :- चालू वर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना बी-बियाणे व रासायनिक खते ही निश्चित करून दिलेल्या दरानुसारच उपलब्ध करून द्यावीत.बियाणांची आणि रासायनिक खतांची जाणीवपूर्वक कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या आणि शेतकऱ्यांना जास्त दराने बियाणे व खतांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर प्रसंगी फौजदारी खटले भरण्याचा इशारा राज्याच्या कृषी विभागाने दिला आहे.

राज्यात यावर्षी खरिपाच्या क्षेत्रात १ लाख दहा हजार हेक्टरने वाढ झाली आहे.यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बियाणे आणि रासायनिक खतांची गरज शेतकऱ्यांना लागणार आहे.या पार्श्वभूमीवर राज्यातील काही बी- बियाणे आणि खते विक्रेते हे जाणीवपूर्वक बियाणांची कृत्रिम टंचाई निर्माण करत असल्याचे राज्याच्या कृषी विभागाच्या निदर्शनास आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना जास्तीच्या दराने बियाणे व खतांची खरेदी करावी लागत आहे.या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने हा इशारा दिला आहे.या वृत्ताला कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

यंदा खरिपाच्या क्षेत्रात वाढ झाल्याने बियाण्यांच्या व खतांच्या पुरवठ्याबाबत सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. सध्याची बियाणांची एकूण मागणी ही १८ लाख क्विंटल इतकी आहे.मात्र क्षेत्रात वाढ झाल्यामुळे राज्याच्या कृषी विभागाने यंदा २४ लाख क्विंटल बियाणे मंजूर केले आहे.यापैकी आतापर्यंत १३ लाख क्विंटल वितरित करण्यात आले आहे. दरम्यान,कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी खरीप हंगाम पूर्व तयारीबाबतची आढावा बैठक घेतली. दरम्यान, राज्याच्या कृषी विभागाने बियाणे व खते यांचे गैरव्यवहार रोखून शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी काही कृषी कायदे प्रस्तावित केले आहेत.हे कायदे विधिमंडळाच्या विचारार्थ प्रलंबित असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

टास्क फोर्स स्थापन करणार दरम्यान, चालू वर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना सर्व प्रकारचे बियाणे योग्य भावात मिळावेत आणि रासायनिक खतांचा मुबलक साठा व त्याचे योग्य वितरण व्हावे, या उद्देशाने एक टास्क फोर्स स्थापन करण्याचा आदेश राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी विभागाला दिला आहे. या आदेशानुसार कृषी विभागाच्या वतीने टास्क फोर्स स्थापन केले जाणार आहे. या टास्क फोर्सच्या माध्यमातून खरीप हंगामातील बियाणे व खतांच्या उपलब्धतेबाबतची योग्य कार्यवाही करता येणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर लाडक्या बहिणींचा ऑगस्ट महिन्याचा मार्ग मोकळा; खात्यात येणार दीड हजार..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या प्रलंबित हप्त्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.विशेष म्हणजे,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी...

पुढील तीन तासात दोन जिल्ह्यात बरसणार जोरदार पाऊस; नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-उघडीप देणारा पाऊस कुठे जोरदार पडतो,तर कुठे एक थेंबही पडत नाही.निसर्गाचा लहरीपणा या वर्षी चांगलाच धडा शिकवायला लागल्याचे चित्र आहे.विशेष म्हणजे,काही...

निर्धारित ध्वनी मर्यादेचे उल्लंघन; डीजे मालक व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल.. – डीजे सह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम  सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा पवनपार येथील नवयुवक बाल गणेश मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्रेशर मिड(Pressure...

डुंबरसात्या आणण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गावालगतच्या जंगल परिसरात 'डुंबरसात्या' म्हणजेच मशरूम आणण्यासाठी गेलेल्या एका ४५ वर्षीय इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,गुरुवार २४ सप्टेंबर रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!