Sunday, April 19, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तनरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी…-मोदींना पगार व भत्ते मिळणार किती? घ्या जाणून…

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी…-मोदींना पगार व भत्ते मिळणार किती? घ्या जाणून…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-नरेंद्र मोदी यांनी आज राजधानी दिल्लीत तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली.पंतप्रधान मोदी आज सकाळीच राजघाटावर पोहोचले आणि ते राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या समाधीवर नतमस्तक झाले.त्यानंतर त्यांनी अटल बिहारी वाजपेयींच्या समाधीचे दर्शन घेतले.तसेच वॉर मेमोरिलला भेट देऊन वीर जवानांना अभिवादन केले.९००० पाहुण्यांच्या उपस्थितीत मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली.याबरोबरच कॅबिनेट मंत्रिमंडातील काही मंत्र्यांनीही शपथ घेतली.

पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांना १.६६ लाख रुपये प्रती महिना पगार मिळेल.यात ५० हजार रुपये बेसिक,३००० रुपये एक्सपेंस अलाउन्स,  ४५००० पार्लियामेंटरी अलाउन्स(भत्ता),२००० रुपये डेली अलाउन्सचा समावेश असतो.पगाराशिवाय देशाच्या पंतप्रधानांना विविध सुविधा देखील मिळतात.यात सरकारी घर,एपीजी सुरक्षा व्यवस्था,सरकारी वाहन, एअरक्राफ्ट,आंतरराष्ट्रीय ट्रिप,फूड एक्सपेन्सेस,टेलिफोन कनेक्शन,कर्मचारी अशा सुविधा दिल्या जातात.

याशिवाय पंतप्रधानांना परदेश यात्रांसाठी सरकारकडून यात्रा भाडे,तिथे थांबण्याचा आणि जेवणाचा खर्चही दिला जातो.याशिवाय निवृत्तीनंतर पाच वर्षांपर्यंत निवासस्थान,वीज,पाणी,सुरक्षा व्यवस्था सुरु राहाते.याशिवाय अनेक टॅक्स फ्री भत्तेही मिळतात.यात ट्रेन,विमानाची मोफत यात्रा,वैद्यकिय सुविधा आणि कार्यालयाचा खर्च म्हणून वर्षाला १,००००० रुपयांचा समावेश असतो.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची; सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाची...

चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच उडाला भडका; पतीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-स्वयंपाकघरातील गॅस लिकेज असल्याने चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच आगीचा अचानकपणे भडका उडाला आणि काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला.दरम्यान,संपूर्ण घरात...

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!