Sunday, April 19, 2026
Homeभंडाराशेअर मार्केट मध्ये रक्कम वाढविण्याचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक...

शेअर मार्केट मध्ये रक्कम वाढविण्याचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-शेअर मार्केटमध्ये पैशाची गुंतवणूक करून रक्कम वाढविण्याचे आमिष दाखवून १३ लाख २३ हजार ७४५ रुपयांची महिलेची फसवणूक करण्यात आली असून या प्रकरणी प्रज्ञा लोणारे यांच्या तक्रारीवरून पवनी पोलिसांनी आठ कंपन्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
याबाबत असे की,प्रज्ञा नकटू लोणारे वय ३२ वर्षे, पवनीतील शिवाजीनगरात वानखेडे यांच्या घरी भाड्याने राहतात.त्यांनी पतीच्या मोबाइलवरून व्हॉट्सॲपचा वापर केला.यात शेअर मार्केटमध्ये पैशाची गुंतवणूक करून रक्कम वाढविण्याचे आमिष दाखविण्यात आले.महिलेकडून ३ ते २९ ऑक्टोंबर पर्यंत एकूण १३ लाख २३ हजार ७४५ रुपये सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पवनी येथील बँक खात्यातून मागविण्यात आले.त्यानंतर महिलेने कंपन्यांना रक्कम परत मागितली असता,पुन्हा २० टक्क्यांप्रमाणे एकूण १० लाख ५७ हजार ४९० रुपयांची मागणी करण्यात आली. मात्र,महिलेने मागणीची पूर्तता केली नाही.त्यांनतर महिलेचे खाते बंद करून त्यांना ग्रुपमधून बाहेर काढण्यात आले.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने पवनी पोलिसात धाव घेऊन रीतसर तक्रार दिली.पोलिसांनी तक्रारीवरून आठ कंपन्यांविरोधात गुन्हा नोंदविला आहे.पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक मानकर करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

कहाणीमध्ये ट्विस्ट.! ना वाघ ना बिबट्या; घातपाताचा संशय.. – जंगल परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीट एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

पोलिसांच्या एका चुकीमुळे गडचिरोली हत्या प्रकरणातील ‘त्या’ आरोपीस मिळाला जामीन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सात वर्षावरील गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला चोवीस तासांच्या आत न्यायालयातील न्याय दंडाधिकारी यांच्या समक्ष हजर करावे लागते.त्यानुसार,न्यायालय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!