चंद्रपूर :-मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून झालेल्या शिवरायांच्या अवमानना विरोधात चंद्रपुरात निषेध मोर्चा काढण्यात आला.यावेळी ‘आम्ही शिवप्रेमी चंद्रपूरकर’ या बॅनरखाली शिवप्रेमींनी आज,बुधवारी ४ सप्टेंबरला रस्त्यावर उतरले.सरकारच्या विरोधात घोषणा देत या घटनेचा निषेध करण्यात आला.या मोर्चामध्ये राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक संस्था,विविध कार्यकर्ते सहभागी झाले होते.
शिवरायांच्या पुतळा अवमानना विरोधात चंद्रपूरकर शिवप्रेमी उतरले रस्त्यावर…
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर शहरातून छत्रपती शिवाजी महाराज चौकातील
शिव शिल्पाला अभिवादन करून आज बुधवारी दुपारी १२ वाजता निषेध मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चाच्या अग्रस्थानी महिला शिवप्रेमींनी हातात निषेध व्यक्त करणारा बॅनर घेऊन मोर्चाचे नेतृत्व केले. शिवप्रेमींनी “निषेध असो,निषेध असो,शिवद्रोही सरकारचा निषेध असो”, “छत्रपतींचा अपमान करणाऱ्या सरकारचा निषेध असो” “मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बांधकाम मंत्री राजीनामा दो,राजीनामा दो” “छत्रपती शिवरायांचा अवमान खपवून घेतल्या जाणार नाही”, “छत्रपतींच्या सन्मानात,शिवप्रेमी मैदानात” “जय जिजाऊ जय शिवराय” “जय भवानी जय शिवाजी” “छत्रपती शिवाजी महाराज की जय”
“शिवस्मारक जमिनीवर झालेच पाहिजे ” शिवद्रोही
सरकार होश में आव” अशा गगनभेदी घोषणांनी चंद्रपूर दणाणून गेले होते.
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

