Friday, September 4, 2026
Homeदेसाईगंजशिवराजपूर येथे 'ज्ञानज्योती' वाचनालयाचे उद्घाटन..

शिवराजपूर येथे ‘ज्ञानज्योती’ वाचनालयाचे उद्घाटन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या  शिवराजपूर येथे ज्ञानज्योती युवा मंडळाच्या पुढाकाराने तथा ग्रामपंचायतीच्या सहकार्याने गावातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तथा बौद्धिक क्षमतेत भर पडावा तसेच अनेकांना वाचनाची सवय जडावी,यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम राबवून ‘ज्ञानज्योती’ वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले.
वाचनालयाच्या उभारणीसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने इमारत उपलब्ध करून देण्यात आली,तर ग्रामस्थांनी इतर साहित्य पुरवठ्यासाठी आर्थिक योगदान दिले. त्यातून फर्निचर,लाईन फिटिंग व इतर आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्या.ग्रामस्थांच्या एकजुटीमुळेच ज्ञानज्योती वाचनालय सर्व सोयी-सुविधांनी सज्ज झाले आहे.सदरचे वाचनालय हे स्पर्धा परीक्षा,शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षणासाठी उपयुक्त ठरणार आहे. याशिवाय,सर्वसामान्य वाचकांसाठीही एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे.या उपक्रमात योगदान देणाऱ्या सर्व वर्गणीधारक ग्रामस्थांचे आभार ग्रामपंचायत तथा ज्ञानज्योती युवा मंडळाच्या वतीने करण्यात आले असून गावात शैक्षणिक वातावरण वृद्धिंगत करण्यासाठी ज्ञानज्योती वाचनालय हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे.सदर वाचनालयाचे उद्घाटन शिवराजपूर गट ग्रामपंचायतीच्या सरपंचा सयाम यांनी केले.तर कार्यक्रमाचे संचालन प्रा.योगेश तुपट,प्रास्ताविक दिनेश बेदरे व उपस्थितांचे आभार लोकमान्य बरडे यांनी मानले. प्रसंगी अध्यक्ष वासुदेव झीलपे,ग्रामपंचायत पदाधिकारी, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

मोहफुलाची दारू नाही; तर पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखून त्यापासून पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची सक्षम मूल्यसाखळी जिल्ह्यात उभारावी.महिला बचत गटांना...

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!