Thursday, September 3, 2026
Homeगडचिरोलीमुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेची ऑनलाइन नोंदणी सुरू..

मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेची ऑनलाइन नोंदणी सुरू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-शैक्षणिक सत्र २०२५-२६ करिता इतर मागासवर्ग,विमुक्त जाती,भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेची ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे.या प्रक्रियेत शासकीय वसतिगृहांबरोबरच ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना अंतर्गत उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश दिला जाणार आहे.
प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज👇
शासनाच्या http://hmas.mahait.org या ऑनलाइन पोर्टलवरून अर्ज करता येणार असून अर्ज दाखल करण्याची मुदत १९ ते २९ सप्टेंबर २०२५ अशी निश्चित करण्यात आली आहे.ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट व आवश्यक कागदपत्रे संबंधित वसतिगृह प्रमुखांकडे सादर करणे बंधनकारक आहे.
प्रवेश निकष व प्राधान्य👇
शासकीय वसतिगृहांमध्ये प्रवेश गुणवत्तेनुसार व वसतिगृह क्षमतेनुसार दिला जाणार आहे.पात्रता असूनही वसतिगृहात जागा न मिळालेल्या विद्यार्थ्यांना स्वयंम व आधार या योजनांमधून प्रवेशासाठी विचारात घेतले जाईल.त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क👇
अधिक माहितीसाठी इतर मागास वर्ग,विशेष मागास प्रवर्ग व विशेष जाती भटक्या जमाती मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह गडचिरोली येथील गृहपाल किंवा सहाय्यक संचालक,इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय,गडचिरोली यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ.सचिन मडावी,सहाय्यक संचालक,इतर मागास बहुजन कल्याण विभाग,गडचिरोली यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!