भंडारा :-शिकारीच्या शोधात असलेला बिबट्या चक्क शेतातील विहिरीत आढळून आल्याने परिसरातील शेतकऱ्यांची काहीकाळ तारांबळ उडाल्याची घटना लाखांदूर तालुक्याच्या खोलमारा येथील शेतशिवारात आज,शनिवार २२ नोव्हेंबरला सकाळच्या सुमारास उघडकीस आली.खोलमारा गावातील शेतकरी ईश्वर भिवाजी डोये हे आज शनिवारी सकाळच्या सुमारास शेतावर गेले असता मोटार पंप सुरू करण्यासाठी विहिरीजवळ जाताच पाहतात तो काय एक बिबट्या विहिरीत पडून असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. लागलीच परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ याची माहिती वन विभागास दिली.घटनेची माहिती मिळताच वनविभागाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.काही तास सुरू असलेल्या बचावकार्यास अखेर यश आले आणि विहिरीतून बिबट्याला सुरक्षित बाहेर काढून जंगल परिसरात सोडण्यात आले.
विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

