Friday, October 16, 2026
Homeनागपूरवाघाने सकाळी महिलेचा जीव घेतला अन् सायंकाळी दोन गायींवर घातली झडप ..

वाघाने सकाळी महिलेचा जीव घेतला अन् सायंकाळी दोन गायींवर घातली झडप ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-चंद्रपूर जिल्ह्यासह वाघांनी नागपूर जिल्ह्याच्या कुही आणि पारशिवनी तालुक्यातील दुर्गम भागात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.वाघाने २० दिवसांत जनावरे व माणसांवर हल्ले करून शिकारी केल्या आहेत. काल शनिवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील उमरझरी शेत शिवारात मिरची तोडत असलेल्या शेतकरी महिलेवर वाघाने हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीस आली.तर इकडे वाघाने कुही तालुक्याच्या वेलतूर-प्रतापपूर शिवारातील शेतात काम करणाऱ्या महिलेवर हल्ला चढवून जीव घेतल्याची घटना सकाळी उघडकीस आली,तर पारशिवनी तालुक्यातील चिंचभवन शिवारात शनिवारी सायंकाळच्या सुमारास वाघाने दोन गायींवर झडप घालत गंभीर जखमी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.निर्मला श्रीपत गभणे वय ५८ वर्षे,रा.वेलतूर,ता.कुही,जि.नागपूर असे मृत महिलेचे नाव आहे.
वेलतूर-प्रतापपूर जंगल शिवारात गभणे कुटुंबाची
शेतजमीन आहे.निर्मला शुक्रवारी शेतावर कामानिमित्ताने गेली होती.सायंकाळ होऊनही घरी परत न आल्याने कुटुंबातील लोकांनी शोधाशोध केली असता ती मिळाली नाही.मात्र त्या शिवारात वाघ दिसल्याची माहिती वनविभागाला व वेलतूर पोलिसांना देण्यात आली. रात्रीच्या वेळी अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता परिसरात वाघ दिसून आला.त्यावरून सदर महिलेची शिकार वाघाने केली असावी,असा अंदाज व्यक्त करण्यात आला.शनिवारी सकाळी अधिकारी व नातेवाईक शिवारात गेले असता पुन्हा वाघ दिसला. वाघाने निर्मला गभणेची शिकार केल्याचे स्पष्ट झाले. वनकर्मचारी यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कुही येथे पाठविला.
दुसऱ्या घटनेत पारशिवनी तालुक्यातील चिंचभवन शिवारात शनिवारी सायंकाळच्या सुमारास वाघाच्या हल्ल्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास दबा धरून बसलेल्या वाघाने दोन गायींवर झडप घालत त्यांना गंभीर जखमी केले. चिंचभवन येथील शेतकरी रमेश भोंडे हे त्यांच्या पाळीव जनावरांना नेहमीप्रमाणे शिवारात चराईसाठी घेऊन गेले होते.यावेळी सायंकाळच्या सुमारास झुडपात लपून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला चढवला.या हल्ल्यात दोन गायी गंभीर जखमी झाल्या. या हल्ल्यानंतर वाघाने रमेश भोंडे यांच्याकडेही वळण्याचा प्रयत्न केला.मात्र,त्यांनी प्रसंगावधान राखत हातातील काठी व सोबत असलेल्या कुत्र्याच्या मदतीने स्वतःचा बचाव केला.त्यांच्या आरडाओरडीनंतर आसपासचे शेतकरी व ग्रामस्थ घटनास्थळी धावून आल्याने मोठा अनर्थ टळला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणार दिवाळीपूर्वीच दोन हजाराची भाऊबीज भेट..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी आनंदाची बातमी असून या सर्वांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी...

महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन; राज्यात ५० लाखांहून अधिक अर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेती व शेतीपूरक व्यवसायांमध्ये कार्यरत महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत ओळख मिळवून देणाऱ्या महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अधिकाधिक महिलांनी अर्ज करावेत,असे आवाहन आंतरराष्ट्रीय...

अखेर राज्यातील सर्व ग्राम रोजगार सेवकांच्या मानधन वितरणाचा मार्ग मोकळा..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्राम पातळीवर काम करणाऱ्या ग्रामरोजगार सहायकांच्या मानधन वितरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून राज्यातील सर्व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!