Wednesday, July 15, 2026
Homeगडचिरोलीअवैधरित्या सागवान व बिजा वृक्षतोड प्रकरणी तिघांना अटक..

अवैधरित्या सागवान व बिजा वृक्षतोड प्रकरणी तिघांना अटक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-अवैधरित्या सागवान व बिजा वृक्षतोड केल्याप्रकरणी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना उद्या,सोमवार ३० मार्चपर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली आहे.संतोष देवराव तोफा,कालिदास बिड्डू आतला व चिन्नू रैनू दुगा अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून अवैध वृक्षतोडीची घटना गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील लेखा-मेंढा गावालगतच्या जंगल परिसरात उघडकीस आली.
मेंढा येथील वनरक्षक एच.के.मडावी व क्षेत्र सहायक ए.के.गांगरेड्डीवार हे दुधमाळा परिसरात गुरुवार,२६ मार्च २०२६ रोजी गस्तीवर असतांना मेंढा गावालगत संतोष देवराव तोफा यांच्या शेतात सागवान व बिजा प्रजातीची झाडे पडलेली आढळून आली.ही झाडे अवैधरित्या जंगलातून तोडून आणल्याचे निष्पन्न झाले.या कारवाईत वनाधिकाऱ्यांनी १९ सागवान व २ बिजा प्रजातीची लाकडे जप्त केली.भारतीय वन अधिनियम १९२७ अन्वये तिघांना अटक करून त्यांना उद्यापर्यंत वनकोठडी सुनावण्यात आली आहे.सदरची कारवाई उपवनसंरक्षक आर्या व्ही.एस, सहाय्यक वनसंरक्षक अंबरलाल मडावी यांच्या मार्गदर्शनात दक्षिण धानोराचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुमित पुरमशेट्टीवार यांचेसह पथकाने केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

आता भेसळयुक्त आणि दूषित अन्नाची एकाच तक्रारीवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच एफएसएसएआयने भेसळयुक्त आणि दूषित अन्नावर कारवाई करण्यासाठी 'फूड सेफ्टी कनेक्ट' ॲप सुरू केले आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!