Wednesday, June 3, 2026
Homeनागपूरवन विभागात खळबळ; वाघाची शिकार करून पंजे,मिशा आणि दात केले गायब..

वन विभागात खळबळ; वाघाची शिकार करून पंजे,मिशा आणि दात केले गायब..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नागपूर प्रादेशिक वनविभागांतर्गत येणाऱ्या खापा वनपरिक्षेत्रात वाघाची शिकार झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.अशातच अज्ञात शिकाऱ्यांनी वाघाचे चारही पंजे,मिशा आणि दात काढून नेल्याने वन विभागात एकच खळबळ उडाली आहे.
खापा वन परीक्षेत्रातील नागलवाडी वन कक्षाअंतर्गत कोरमेटा नियतक्षेत्रातील सिरोंजी हद्दीत धनगाळा नाल्यामध्ये वाघ पडून असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी नागलवाडीचे वनपाल एस.डी.गडलिंगे यांना दिली.माहिती मिळाल्यानंतर एस.डी.गडलिंगे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण लेले व इतर वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.घटनेबाबत खात्री केली असतांना घटनास्थळी वाघ मृतावस्थेत आढळून आला.सदर घटनेची माहिती नागपूर प्रादेशिकचे उपवनसंरक्षक डॉ. भारत सिंह हाडा,सहाय्यक वनसंरक्षक व्ही.सी.गंगावणे यांना देण्यात आली.मृत वाघाचे वय तीन ते साडेतीन वर्षाच्या दरम्यान असल्याचे निदर्शनास आले.तसेच वाघाचे चारही पंजे, मिश्या आणि दात शिकाऱ्यांनी नेल्याचे आढळून आले.घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसरात पाहणी केली असता परिसरातील ११ केव्हीच्या विद्युत वाहिनीवरुन लोखंडी तार व बांबू खुंट्यांच्या सहाय्याने वन्यप्राण्यांची शिकार करण्याकरिता सापळा लावण्यात आला असल्याचे वनाधिकाऱ्यांच्या
निदर्शनास आले.त्यानुसार सर्व साहित्य जप्त करण्यात आले असून वाघाची शिकार वीज तारेच्या धक्क्याने करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.यावेळी तपासासाठी पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या श्वान पथकाची मदत घेण्यात आली.सदर प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.घटनास्थळी आढळलेल्या साहित्यांच्या आधारे व यापूर्वी वन्यजीव गुन्ह्यातील आरोपींच्या आधारे शिकाऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे.सदर प्रकरणाची चौकशी व तपास उपवनसंरक्षक डॉ.भारत सिंह हाडा यांच्या माार्गदर्शनात सहाय्यक वनसंरक्षक व्ही.सी.गंगावणे,वनपरिक्षेत्र अधिकारी एस.जी.आठवले करीत आहेत. यावेळी खापा पोलिस ठाण्याचे अधिकारी गिरी, ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल मस्के हे पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब...

तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील ‘शेतकरी योजना’ या उपक्रमांतर्गत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी...

गोदाम बांधकाम,तेल काढणी युनिट,कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग युनिटसाठी लाखो रुपयांपर्यंत अनुदान.. – बना स्वतःच मालक; ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील भुईमूग,करडई,तीळ यांसारख्या तेलबिया पिकांचे तसेच तूर,हरभरा व इतर कडधान्यांचे उत्पादन वाढविण्यासोबतच त्यांचे मूल्यवर्धन आणि शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी...

शाळेची पहिली घंटा वाजणार ‘या’ दिवशी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील वाढती उष्णता लक्षात घेता यंदा शाळेची पहिली घंटा उशिरा सुरू होण्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून यंदा २०२६-२७ या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!