Tuesday, April 28, 2026
Homeगडचिरोलीवनविभागाची धडक कारवाई; तब्बल १२ शिकारी ताब्यात.. - चार शेकरू,एक उडनारी खार,एक...

वनविभागाची धडक कारवाई; तब्बल १२ शिकारी ताब्यात.. – चार शेकरू,एक उडनारी खार,एक हरीनाल पक्षी, घुबड प्रजातीतील पक्षी व इतर अवयव हस्तगत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-आलापल्ली वनपरिक्षेत्रात सामूहिक जंगल गस्ती दरम्यान वनविभागाने मोठी कारवाई करत १२ शिकाऱ्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातून वन्यजीवांचे अवयव व शिकारीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी भारतीय वन अधिनियम,१९२७ तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियम,१९७३ अंतर्गत गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
काल रविवारी सायंकाळच्या सुमारास जंगलात काही जण शिकारीसाठी लपून बसल्याची माहिती वनविभागाला प्राप्त झाली.त्यानंतर गस्ती पथकाने तत्काळ परिसरात सापळा रचून पाठलाग केला असता १२ जणांना ताब्यात घेण्यात आले.या कारवाईत शिकाऱ्यांकडून विविध वन्यजीवांचे अवशेष जप्त करण्यात आले.जप्त करण्यात आलेल्या वन्यजीवांमध्ये पारध केलेले चार शेकरू,एक उडनारी खार,एक हरीनाल पक्षी तसेच घुबड प्रजातीतील पक्षी व इतर अवयवांचा समावेश आहे.
सदरची कारवाई ही आलापल्लीच्या उपवनसंरक्षक  दिपाली तलमले व उपविभागीय वन अधिकारी  शिवपाल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी गोरख गणवीर यांच्या नेतृत्वात पार पडली.या मोहिमेत क्षेत्र सहाय्यक पुन्नमचंद बुधवार,वनरक्षक  दत्ता सुरवसे,निलेश टेकाम,सुधाकर सोयाम,वाहन चालक सुरेश मडावी,चौकीदार श्याम जंगमवार, नामाजी मडावी व देवाजी सलामे आदी उपस्थित होते.
वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने अशा प्रकारच्या अवैध कृत्यांवर वनविभागाचे सतत लक्ष असून पुढील काळातही कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार आहेत. संशयास्पद हालचालींबाबत नागरिकांनी तात्काळ वनविभागास माहिती देण्याचे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी गोरख गणवीर यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

घर बांधणे झाले महाग; लोहा,सिमेंट,विटा अन् रेतीचे भाव कडाडले..

उद्रेक न्युज वृत्त :-बांधकाम साहित्यांच्या वाढत्या किमतींमुळे लोकांच्या बजेटवर मोठा ताण आल्याचे चित्र आहे.यामुळे सर्वसामान्यांना घर बांधणे कठीण झाले आहे.लोहा,सिमेंट,विटा अन् रेतीचे भाव कडाळल्याने...

खेळता-खेळता सांडपाण्याच्या खड्यात पडल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-खेळत असतांनाच घरालगत असलेल्या सांडपाण्याच्या खड्यात पडून ३ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील कोंढाळी येथील शिक्षक...

कारखान्यात आढळून आले बालकामगार; संचालकासह चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखादी कंपनी असो वा कुठलेही दुकान, हॉटेल,ढाबे,चहाची दुकाने वा इतर आस्थापनांमध्ये बालकांना कामावर ठेवणे गंभीर गुन्हा आहे.यात १४ वर्षे वयाखालील मुलांचा...

आता लग्न पत्रिकेवर टाकावी लागणार जन्मतारीख..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात अजूनही विशेषतः ग्रामीण आणि काही दुर्गम भागात छुप्या पद्धतीने बालविवाह लावले जातात.अनेकदा मुलगी अल्पवयीन असतांनाही तिचे लग्न लावून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!