Thursday, June 25, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तवन्यजीवांचा मानवी वस्त्यांजवळ वाढला संचार.. - वन विभागाने तातडीने पावले उचलण्याची गरज..

वन्यजीवांचा मानवी वस्त्यांजवळ वाढला संचार.. – वन विभागाने तातडीने पावले उचलण्याची गरज..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध जिल्ह्यांसह विशेष करून विदर्भातील चंद्रपूर,नागपूर,गोंदिया,भंडारा व गडचिरोली व इतर जिल्ह्यात मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत असल्याचे चित्र समोर येऊ लागले आहे.जंगलातील वाघ,बिबट,गवे, अस्वले यासारखे वन्यप्राणी आता थेट गावठाण, शेतजमीन आणि रस्त्यांवर येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पाणी आणि हिरव्या चाऱ्याच्या शोधात हे प्राणी मानवी वस्तीच्या दिशेने सरकत असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.यामुळे वाहनधारकांनाही मोठ्याप्रमाणात धोका वाढला असून काही ठिकाणी अपघातांच्या घटनाही घडत आहेत.अनेक गावांमध्ये वन्यप्राणी थेट शेतात शिरून पिकांचे नुकसान करीत आहेत.गेल्या अनेक कालावधीपासून गडचिरोली, गोंदिया व इतर ठिकाणी जंगली हत्तींनी धुमाकूळ घालून नागरिक तसेच शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आणले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी वन्य प्राण्यांचे वावर वाढल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. शेतकरी वर्ग चिंतेत असून रोजच्या जीवनावर याचा परिणाम होत आहे.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता,वन विभागाने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. संघर्षग्रस्त गावांच्या सीमा भागात सौर कुंपण उभारणे, वन्य प्राण्यांसाठी पाण्याचे कायमस्वरुपी स्रोत निर्माण करणे,वन्यजीवांना सुरक्षितपणे जंगलात परतविण्याच्या मोहिमा राबविणे आणि ग्रामस्थांमध्ये जनजागृती करणे अत्यावश्यक ठरत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आकांक्षित जिल्हा कामगिरीत गडचिरोली देशात ‘टॉप टेन’ मध्ये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र सरकारच्या 'आकांक्षित जिल्हा' मोहिमेतंर्गत उत्कृष्ट कामगिरी करत गडचिरोली जिल्ह्याने देशभरातील ११२ आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत पहिले १० मध्ये स्थान पटकावले आहे....

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना; कर्जमुक्ती योजनेबाबत वाचा संपूर्ण माहिती.. – कोण पात्र आणि कोण असणार अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधव राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत.अनियमित पाऊस, गारपीट,दुष्काळ,अतिवृष्टी व महापूर यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी...

बहिणीचा छळ असह्य; जावयाचा साळ्यानेच केला खून.. – ५० हजाराची दिली सुपारी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गेल्या सहा वर्षापासून बहिणीचा छळ करीत असल्याच्या रागातून ५० हजाराची सुपारी देत चक्क साळ्यानेच जावयाचा गेम बजावला असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात...

सावधान..! जिल्हा परिषद शाळांतील परिचर भरतीची सोशल मीडियावरील जाहिरात बनावट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सोशल मीडियावर जिल्हा परिषद शाळांमध्ये परिचर(Peon)पदभरतीसंदर्भात प्रसारित होत असलेली जाहिरात पूर्णपणे खोटी,बनावट आणि दिशाभूल करणारी असल्याचा अधिकृत खुलासा जिल्हा परिषदेचे मुख्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!