उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांनी ई-केवायसी करतांना चुका केल्या होत्या.विशेष म्हणजे,आता लाडकी बहीण योजनेत फक्त ई-केवायसी केलेल्या महिलांनाच लाभ दिला जात आहे.ज्यांची ई-केवायसी करतांना चुक झाली; अश्यांना दुरुस्ती करण्याची शेवटची संधी देण्यात आली आहे.लाडकी बहीण योजनेत ई-केवायसीत दुरुस्ती करण्यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.दरम्यान,याबाबत अनेक अफवा परसवल्या जात आहेत.ई-केवायसी करण्याची मुदत संपली असल्याची बातमी सध्या व्हायरल होत आहे.यावर आता स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी माहिती दिली आहे.आदिती तटकरेंनी लाडक्या बहिणींना कोणत्याही तथ्यहीन बातमीवर विश्वास न ठेवण्यास सांगितले आहे.त्यांनी म्हटले की,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या कपातीबाबत काही माध्यमांकडून प्रसारित करण्यात आलेल्या बातम्या चुकीच्या व तथ्यहीन आहेत.ई-केवायसी करण्याची प्रक्रिया अजूनही सुरू असून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली नाही.या संदर्भात कोणतेही वृत्त प्रसारित करण्यापूर्वी माध्यमांनी तथ्यांची पडताळणी करावी ही नम्र विनंती, असे त्यांनी यांच्या ‘एक्स’ अकाऊंटवर स्पष्ट केले आहे. यामुळे लाडक्या बहिणींच्या मनातील संभ्रम दूर झाला आहे.ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च असल्याने ई-केवायसीसाठी केवळ दहा दिवस उरले आहेत.
लाडक्या बहिणींसाठी शेवटची संधी; ई-केवायसीसाठी उरले केवळ दहा दिवस..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

