Monday, October 26, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तप्रेमात धोका आणि ज्यांनी कधीकाळी कमी लेखले; आज तेच लोकं सॅल्युट मारतात.....

प्रेमात धोका आणि ज्यांनी कधीकाळी कमी लेखले; आज तेच लोकं सॅल्युट मारतात.. – आयएएस अधिकाऱ्याची रोमांचक कहाणी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-ज्या वयात करिअरचा पाया मजबूत करायचा असतो,त्याच वयात प्रेमात पडल्याने अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले आणि आयुष्याची गणिते बदलली.प्रेम ही अशी गोष्ट आहे,जी माणसाला एकतर नव्याने ओळख देते किंवा त्याला पूर्णपणे उद्ध्वस्त करते.मात्र,प्रेमात मिळालेला धोका आणि वैयक्तिक आयुष्यातील बदलले चित्र,यामुळे खचून न जाता
स्वतःला सिद्ध करण्याचे आव्हान स्वीकारले आणि आज ते देशातील सर्वात कठीण मानली जाणाऱ्या युपीएससी (UPSC)परीक्षेत ४८ व्या रँकने उत्तीर्ण होऊन आयएएस (IAS)अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.ही कहाणी आहे बिहारच्या पाटणा जिल्ह्यातील बिसुनपूर पाकरी येथील आदित्य पांडे यांच्या प्रेरणादायी कठीण प्रसंगाची.
आदित्य पांडे हे सुरुवातीपासूनच अभ्यासात अत्यंत हुशार होते.९ वी पर्यंत त्यांचा निकाल नेहमीच उत्कृष्ट असायचा.मात्र,१० वीत असतांना त्यांचा जीव एका मुलीवर जडला आणि आयुष्याची गणिते बदलली.
१० वीच्या निकालात त्यांच्या गुणांचा आलेख कोसळला. पुढे वडिलांच्या इच्छेखातर त्यांनी इंजिनिअरिंग पूर्ण केले. मात्र त्यांचे मन त्या ठिकाणी रमत नव्हते.ज्या मुलीसाठी त्यांनी सर्वस्व पणाला लावले होते,त्याच मुलीने अर्ध्यातच त्यांची साथ सोडली.नाते तुटले आणि आयुष्याची महत्त्वाची वर्षे वाया गेल्याची जाणीव त्यांना झाली.पण याच वळणावर आदित्य यांनी रडत बसण्यापेक्षा लढण्याचा निर्णय घेतला. “एक दिवस असा येईल,जेव्हा संपूर्ण जग मला सॅल्युट करेल आणि मी क्लास वन अधिकारी होऊन दाखवेन,” असा ठाम निर्धार त्यांनी स्वतःशीच केला.त्यांनी त्या मुलीलाही ठणकावून सांगितले होते की, “मी एक दिवस आयएएस बनूनच दाखवेन.” ज्या क्षेत्राची त्यांना काहीच माहिती नव्हती,अशा युपीएससीच्या मैदानात त्यांनी उडी घेतली. हाताशी असलेली चांगली नोकरी सोडली आणि ते दिल्लीला अभ्यासासाठी गेले.पहिल्या आणि दुसऱ्या प्रयत्नात त्यांना अपयश आले,पण त्यांनी हार मानली नाही.अखेर २०२३ च्या परीक्षेत त्यांच्या कष्टाचे चीज झाले आणि त्यांनी देशात ४८ वा रँक पटकावून आपले स्वप्न सत्यात उतरवले.आज आदित्य पांडे हे झारखंडमधील रांची येथे आपले कर्तव्य बजावत आहेत.ज्यांनी त्यांना कधीकाळी कमी लेखले होते,आज तेच लोकं त्यांना सॅल्युट मारतात.आदित्य पांडे तरुणांना संदेश देतांना म्हणतात की, “तुमचा बदला हा कधीही हिंसक नसावा,तर तो तुमच्या यशातून जगाला दिसला पाहिजे.”
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उपाययोजनांचे सकारात्मक फलित; गडचिरोली जिल्ह्यात रस्ते अपघातातील मृत्यूंमध्ये २७ टक्के घट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या नऊ महिन्यांत रस्ते अपघातांतील मृत्यूंच्या संख्येत गतवर्षीच्या समान कालावधीच्या तुलनेत २७ टक्के घट नोंदविण्यात आली...

विधान परिषद निवडणूक; उद्याला तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या उमेदवारांचा फैसला..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या पाच जागांसाठी शुक्रवार २३ ऑक्टोंबर २०२६ रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली.यामध्ये नागपूर पदवीधर...

ट्रॅव्हल्सद्वारे विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या तीन महिलांना रंगेहात अटक..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नागपूरहून ट्रॅव्हल्सद्वारे विदेशी दारूची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या मध्य प्रदेशातील तीन महिलांना चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चंद्रपुरातील वरोरा नाका चौकात सापळा...

धावत्या इलेक्ट्रिक बसला भीषण आग; जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-राज्य परिवहन महामंडळाच्या एका धावत्या इलेक्ट्रिक 'शिवाई' बसला अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना आज,सोमवार २६ ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास पुणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!