Tuesday, May 26, 2026
Homeनागपूरलाच घेण्यासाठी तगादा; वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात..!

लाच घेण्यासाठी तगादा; वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :-३० वर्षीय तक्रारदाराचे घराचे बांधकाम सुरू आहे.त्यामुळे त्यांनी वन विभागाची परवानगी घेऊन सागवान लाकडाची दारे बनविण्यासाठी ६ फेब्रुवारीला भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी येथून १५ सागवानाची लाकडे आणली.ही लाकडे त्यांनी लकडगंजमधील धनलक्ष्मी सॉ मिलमध्ये देऊन १५ पैकी ५ लाकडांच्या पाट्या तयार केल्या.या पाट्या घरी नेण्यासाठी त्यांनी वनविभागाच्या लकडगंज कार्यालयातून परवानगीदेखील घेतली.परंतु लाकडावर हॅमर मार्क करण्यासाठी आलेला आरोपी वनरक्षक सोनुले  याने हॅमर मार्कसाठी १०० रुपये लागत असतांना ५०० रुपये घेतले.त्यानंतरही आरोपी सोनुले याने १ हजार रुपयांची लाच मागितली.परंतु लाच द्यायची इच्छा नसल्यामुळे संबंधित व्यक्तीने ‘एसीबी’कडे तक्रार दिली.त्यानुसार काल गुरुवारी एसीबीचे अप्पर पोलिस अधीक्षक संजय पुरंदरे, उपअधीक्षक राकेश साखरकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रशांत केदार, भागवत वानखेडे, महेश सेलोकर, सचिन किन्हेकर, विजय सोळंकी यांनी सापळा रचून लाचखोर वनरक्षक सोनुले याला लाच घेतांना रंगेहात अटक केली.रीतसर परवानगी घेतल्यानंतरही सागवान लाकडाच्या पाट्यांवर हॅमर मार्कसाठी १०० ऐवजी ५०० रुपये घेतल्यानंतर एक हजाराची लाच घेणाऱ्या वनरक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने काल गुरुवारी सायंकाळी लकडगंज परिसरात रंगेहात अटक केली आहे.रमेश रामजी सोनुले वय ४३ वर्षे असे लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आलेल्या वनरक्षकाचे नाव आहे.तो लकडगंज येथील वनक्षेत्र सहायक कार्यालयात कार्यरत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर बदल्यांचे सुलतान तुकाराम मुंढेनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा स्वीकारला पदभार..

उद्रेक न्युज वृत्त मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आज,सोमवार २५ मे रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.विशेष...

गडचिरोली जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्ण लहरींचा इशारा; आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-हवामान विभाग,प्रादेशिक केंद्र नागपूर यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात  काही ठिकाणी उष्ण लहर ते तीव्र उष्ण लहर निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात...

हृदय हेलावणारी घटना..! आधी चार मुलांना विहरीत ढकलले व नंतर वडिलाने स्वतःही केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बुलढाणा :-जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यात हृदय हेलावणारी घटना आज,सोमवार २५ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने समाजमन सुन्न झाले आहे.सातपुडा पर्वत रांगांच्या...

बलात्कार पीडितेचे नाव सार्वजनिक करणे पडले महागात.. – गृह विभागाचे प्रधान सचिव,पोलिस आयुक्त तसेच पोलिस निरीक्षक यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बलात्कार पीडितेची किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीची ओळख म्हणजेच नाव किंवा छायाचित्र जाहीर करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!