- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-सध्या सर्वत्र शेतीच्या रोवण्या सुरू असून काही महिला मजूर रोवणीसाठी बाहेर ठिकाणी जातांना दिसून येतात.अश्यातच आज,शुक्रवार १ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास महिला मजुरांना घेऊन जाणारा छोटा टेम्पो रस्त्यावर अचानकपणे आलेल्या मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात नियंत्रण सुटून जोरदार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला आदळला.यात एक महिला मजूर ठार तर आठ गंभीर जखमी झाल्याची घटना लाखनी तालुक्यातील मासलमेटा-लाखोरी वळणावर घडली.यात सायत्रा नेवारे वय ४५,रा.किन्ही या मजूर महिलेचा मृत्यू झाला, तर आठ महिला गंभीर जखमी झाल्या असून,त्यांना भंडारा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे.अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत करीत लाखनी येथील रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमींना भंडारा येथे हलवण्यात आले.गंभीर जखमींमध्ये छत्रपती बोरकर वय ४० वर्षे, जोत्सना सोनवाणे वय ३५ वर्षे,वंदना सोनवाणे वय ३३ वर्षे,प्रमिला शेंडे वय ४० वर्षे, रत्नमाला बोरकर वय ३४ वर्षे,वैशाली सोनवाणे वय ३७ वर्षे,रामकला नेवारे वय ३१ वर्षे आणि प्रमिला गेडाम वय ४२ वर्षे यांचा समावेश आहे.तर उर्वरित ५ जखमी महिलांवर लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात, तर एका महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
- Advertisement -

