Friday, September 4, 2026
Homeदेसाईगंजरेल्वे प्रशासनाने देसाईगंजच्या अंडरब्रिज पाण्याची विल्हेवाट लावावी…!-आमदार कृष्णा गजबे यांची मुख्य रेल्वे...

रेल्वे प्रशासनाने देसाईगंजच्या अंडरब्रिज पाण्याची विल्हेवाट लावावी…!-आमदार कृष्णा गजबे यांची मुख्य रेल्वे प्रबंधकांकडे  मागणी…                          

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :-देसाईगंज शहरातील वाहतुकिसाठी नागरिकांना सोयीचे होण्यासाठी रेल्वे प्रशासनाद्वारे तयार करण्यात आलेला अंडरब्रिज हा नागरिकांसाठी डोकेदुखीचा ठरू लागला आहे.दरवर्षी पावसाळ्यात ब्रीजच्या खाली मार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा जमा होत असल्याने रेल्वे प्रशासनाने पाण्याच्या निकासीसाठी तातडीने उपाय योजना करावी; अशी मागणी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.     

            

देसाईगंज शहर हा रेल्वेच्या सोयीमुळे रस्त्याच्या दोन भागात विभागला गेला असुन रेल्वे वाहतुकिच्या वर्दळीमुळे रेल्वे फाटकेजवळ नागरिकांना आवागमणासाठी यापूर्वी ताटकळत उभे रहावे लागत होते.यावर उपाय योजना म्हणून अंडरब्रिज तयार करण्यात आला.देसाईगंज नगर परिषदने विषेश ठराव घेवुन देखभाल दुरुस्ती सह विद्युत पुरवठ्याचीही हमी घेतली.अशातच रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त साचलेल्या पाण्याच्या निकाशी साठी वॉटर लिफ्टिंग जनरेटर लावुन देण्याची हमी घेतली असतांना रेल्वे अंडरब्रिज तयार होऊन जवळपास ८ वर्षाचा कालावधी लोटुनही रेल्वे प्रशासनाने वॉटर लिफ्टिंग जनरेटर ची सुविधा करुन न दिल्याने रहदारीस त्रास सहन करणाऱ्या नागरिकांकडुन निर्माण होणाऱ्या रोशाला नगर प्रशासनालाच सामोरे जावे लागत आहे.सद्या रेल्वे स्थानकावर कोट्यावधिचे विकासकामे सुरु असुन पाण्याचा निचरा करण्याची कोणतीही सुविधा रेल्वे प्रशासनाद्वारे करण्यात आलेली नाही.साधारण पावसामुळेही बोगद्यात कंबरेच्या वर पाणि साचत असुन त्याच्या निकासी करिता पर्याप्त सुविधा उपलब्ध नसल्याने रेल्वे प्रशासनाने दिलेल्या हमी प्रमाणे वॉटर लिफ्टिंग जनरेटर ची तात्काळ सुविधा करुन द्यावी; अशी मागणि आमदार कृष्णा गजबे यांनी मुख्य रेल्वे प्रबंधक नम्रता त्रीपाठी यांना भ्रमणध्वनी च्या माध्यमातुन केली.

साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय याचे चित्रणही या प्रसंगी व्हिडीओ च्या माध्यमातुन मुख्य रेल्वे प्रबंधकांना पाठविण्यात आले.बोगदा बांधकाम करतांना रेल्वे प्रशासनाने वॉटर लिफ्टींग जनरेटर बसवुन देण्याचे रेल्वे विभागाने दिलेले हमीपत्रही देसाईगंज नगर परिषद मुख्याधिकारी डॉ. कुलभूषण रामटेके यांनी डिएमओ यांना व्हॉट्सॲप द्वारे पाठविण्यात आले आहे.या प्रसंगी मोतीलाल कुकरेजा,माजी उपाध्यक्ष नगर परिषद यांचेसह राजुभाऊ जेठानी जिल्हा उपाध्यक्ष भाजपा,सोपाल अग्रवाल यांचेसह नागरिक उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!