उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यातील वडलापेठ येथील सुरजागड इस्पात प्रा.लि.या आयरन स्पोंज उत्पादन करणाऱ्या कारखान्याचा भूमिपूजन सोहळा आज,१७ जुलैला पार पडला.या सोहळ्यासाठी अजित पवार देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांनी एकत्र प्रवास केला.
अजित पवारांनी आपल्या भाषणावेळी गडचिरोलीकडे येताना हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर काय घडले,याचा प्रसंगच सांगितला.अजित पवार म्हणाले की,तुम्हाला कल्पना नाही,भविष्यात किती मोठे बदल या भागात होतील.जेव्हा आम्ही येत होतो,खूप ढग होते.नागपुरातून उड्डाण केले तेव्हा बरे वाटत होते; मात्र गडचिरोलीजवळ आलो,हेलिकॉप्टर ढगात शिरले, तेव्हा माझ्या पोटात गोळा आला.मी इकडे तिकडे पाहत होतो.सर्व घाबरून होतो,मात्र देवेंद्र फडणवीस निवांत होते.त्यांना म्हणालो पहा आपण ढगात जात आहोत.तेव्हा फडणवीस म्हणाले घाबरु नका माझे आजवर सहा अपघात झालेले आहेत.मला मात्र कधीही काही झाले नाही.मी हेलिकॉप्टरला असलो तर कधी ही काही होत नाही आणि तसेच झाले आम्ही सुखरूप लँड झालो,असा किस्सा अजित पवारांनी सांगितला.त्यावेळी,उपस्थितांमध्ये हशा पिकला. त्यानंतर,त्यांच्या पूर्वजांची पुण्याई आहे ही असेही अजित पवारांनी म्हटले.
गडचिरोली मागास दुर्गम भाग असला तरी निसर्गाने या भागाला भरभरुन दिले आहे.सुरजागड येथील खाणीत हजारो कोटी रुपयांचा लोह खनिज आहे.आधी लॉयड्स मेटल्सने काम सुरू केले आता सुरजागड इस्पात या कंपनीने कारखाना सुरु केला आहे.धर्मराव बाबा आत्राम यांचे खास कौतुक करतो,त्यांनी आपली वडिलोपार्जित दीडशे एकर जमीन या कारखान्यासाठी दिली आहे.तर,उर्वरित जागा कंपनीने खरेदी केल्याची माहितीही त्यांनी दिली.

