Thursday, June 25, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसध्या भारताची लोकसंख्या १४५ कोटी; ३५ वर्षात होणार १७० कोटी…-जागतिक लोकसंख्याविषयक अहवाल...

सध्या भारताची लोकसंख्या १४५ कोटी; ३५ वर्षात होणार १७० कोटी…-जागतिक लोकसंख्याविषयक अहवाल जारी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-येत्या ३५ वर्षांत म्हणजे २०६० पर्यंत भारताची लोकसंख्या १७० कोटींपर्यंत पोहोचणार असून,या शतकाच्या अखेरपर्यंत भारतच जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश राहणार आहे.२०६० नंतर काही काळ भारताची लोकसंख्या स्थिर राहून त्यानंतर त्यात किमान १२ टक्के घट होईल,असे संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात नमूद करण्यात आले आहे.

एकीकडे भारताच्या लोकसंख्येत वाढ होत असताना, चीनची लोकसंख्या झपाट्याने कमी होत जाणार असून,या शतकाच्या अखेरीस चीनची लोकसंख्या ६३ कोटींपर्यंत खाली येईल,असे अहवालात म्हटले आहे.जागतिक लोकसंख्याविषयक अहवाल ११ जून रोजी जारी करण्यात आला.त्यात जगाची लोकसंख्या येत्या ५० ते ६० वर्षांत वाढत १०.३ अब्ज होऊन ती शतकाअखेरीस घटून १०.२ अब्ज असेल,असे म्हटले आहे.

या अहवालात काही विशेष बाबी नमूद करण्यात आल्या आहेत.त्यानुसार सध्या भारताची लोकसंख्या १४५ कोटी असून,ती २०५४ पर्यंत १६९ कोटींपर्यंत पोहोचणार आहे.२०६० पर्यंत भारताची लोकसंख्या १७० कोटींच्या वर जाईल.यानंतर काही काळ भारताची लोकसंख्या स्थिर राहील व त्यानंतर ती घटण्यास प्रारंभ होईल. भारताची लोकसंख्या १२ टक्क्यांनी घटणार आहे. आज २०२४ मध्ये भारत लोकसंख्येच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे.या शतकाच्या अखेरीपर्यंत ते स्थान कायम राहील.

भारताच्या लोकसंख्येची चढती कमान राहणार असली,तरी चीनची लोकसंख्या घटण्यास प्रारंभ झाला आहे.चीनची लोकसंख्या २०२४ मध्ये १४१ कोटी आहे.ती २०५४ मध्ये १२१ कोटींवर येईल.२१०० सालापर्यंत तर चीनची लोकसंख्या ६३.३० कोटींपर्यंत खाली येईल, असे या अहवालात म्हटले आहे. सध्याच्या लोकसंख्येच्या निम्मी लोकसंख्या २१०० मध्ये राहण्याचा अंदाज असून, २०२४ ते २०५४ या ३० वर्षांत सर्वाधिक लोकसंख्या घट असणाऱ्या देशांत जपान आणि रशियापाठोपाठ चीन असेल.संयुक्त राष्ट्रांचे लोकसंख्याविषयक विभागाचे संचालक जॉन विलमॉथ म्हणाले की,सध्या चीनमध्ये असलेला जन्मदर पाहता,चीनच्या लोकसंख्येत घट होण्याचा अंदाज योग्य आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना; कर्जमुक्ती योजनेबाबत वाचा संपूर्ण माहिती.. – कोण पात्र आणि कोण असणार अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधव राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत.अनियमित पाऊस, गारपीट,दुष्काळ,अतिवृष्टी व महापूर यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी...

बहिणीचा छळ असह्य; जावयाचा साळ्यानेच केला खून.. – ५० हजाराची दिली सुपारी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गेल्या सहा वर्षापासून बहिणीचा छळ करीत असल्याच्या रागातून ५० हजाराची सुपारी देत चक्क साळ्यानेच जावयाचा गेम बजावला असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात...

सावधान..! जिल्हा परिषद शाळांतील परिचर भरतीची सोशल मीडियावरील जाहिरात बनावट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सोशल मीडियावर जिल्हा परिषद शाळांमध्ये परिचर(Peon)पदभरतीसंदर्भात प्रसारित होत असलेली जाहिरात पूर्णपणे खोटी,बनावट आणि दिशाभूल करणारी असल्याचा अधिकृत खुलासा जिल्हा परिषदेचे मुख्य...

वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवा; अन्यथा १ जुलैपासून दंडात्मक कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट(HSRP)बसविणे बंधनकारक केले आहे.या कामासाठी शासनाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!