Wednesday, June 3, 2026
Homeनागपूरराज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंदवडे निघाले- विजय वडेट्टीवार

राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंदवडे निघाले- विजय वडेट्टीवार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-राज्यात कायद्याचा धाकच राहिलेला नाही,पुणे हे शिक्षणाचे माहेरघर आहे.शिक्षणाच्या माहेरघरात महिलाच सुरक्षित नाहीत.ही शोकांतिका आहे.पुण्यात एसटी स्थानकात झालेल्या बलात्काराची जबाबदारी राज्य सरकारची आहे.महाविकास आघाडी सरकारने शक्ती कायदा आणला होता,पण या कायद्याची अंमलबजावणी होत नाही.बलात्कार होऊन देखील अजूनही आरोपी पकडला जात नाही,यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंदवडे निघाले आहेत; अशी टीका काँग्रेस नेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी टीका केली.
पुण्याचे पोलीस कमिशनर आधी नागपूरमध्ये होते. पुण्यात गेल्यावर गुन्हेगारांची परेड केली,पुढे काय झाले? आता पुण्यात जाऊन हफ्ते वसूली करण्यात व्यस्त आहेत का? पोलिसांचा धाक उरलेला नाही, त्यामुळे महिला अत्याचाराच्या घटना वाढल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.पुणे बस स्थानकातील बसमध्ये जे सामान सापडले,बसचा वापर हा महिलांवर अत्याचार करण्यासाठी होत होता का? तिथे सुरक्षा रक्षक असतांना बलात्कार घडला राज्यात गृह खात्याची इभ्रत गेल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली.
एसटी स्थानकात बलात्कार झाल्यावर आता परिवहन मंत्री आता बैठक बोलवत आहे,याला उपयोग नाही. गुन्हा घडून गेल्यावर सरकार जागे होते.महिला अत्याचाराच्या घटनेत झालेली वाढ, राज्यात कोलमडलेली कायदा आणि सुव्यवस्था याबाबत येणाऱ्या अधिवेशनात आम्ही प्रश्न उपस्थित करू असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.राज्यात एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्यांना सुरक्षा दिली जाते.राहुल सोलापूरकर असेल किंवा कोरहटकर असेल यांच्यावर कारवाई होत नाही. उलट ते आरएसएस संबंधित असल्याने त्यांना अभय दिले जाते. भाजप यांच्या विरोधात निषेध करत नाही, आता तोंड का शिवली गेली,असाही सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब...

तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील ‘शेतकरी योजना’ या उपक्रमांतर्गत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी...

गोदाम बांधकाम,तेल काढणी युनिट,कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग युनिटसाठी लाखो रुपयांपर्यंत अनुदान.. – बना स्वतःच मालक; ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील भुईमूग,करडई,तीळ यांसारख्या तेलबिया पिकांचे तसेच तूर,हरभरा व इतर कडधान्यांचे उत्पादन वाढविण्यासोबतच त्यांचे मूल्यवर्धन आणि शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी...

शाळेची पहिली घंटा वाजणार ‘या’ दिवशी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील वाढती उष्णता लक्षात घेता यंदा शाळेची पहिली घंटा उशिरा सुरू होण्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून यंदा २०२६-२७ या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!